पोस्ट्स

सप्टेंबर २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्न नासाडी टाळा, अतिवृष्टी टाळा

इमेज
 "  अन्न नासाडी टाळा,  अतिवृष्टी टाळा",   शीर्षक वाचून चमकलात ना ? अन्नाची नासाडी आणि पावसाचा काय तो संबंध ? असा प्रश्न आपणस पडला असेल . तर सांगतो अन्न नासाडीमुळे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरीत्या पाऊस वाढायला मदत होते . आपणाकडून नासाडी केलेल्या अन्नातून मोठ्या प्रमाणत मिथेन या वायूची निर्मिती होते  जागतिक तापमानवाढीसाठी  जो वायू सर्वात जास्त जवाबदार आहे तो म्हणजे मिथेन हा होय . याच मिथेनची निर्मिती अन्न नासाडीतुन होते संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलाविषयी कार्य करणाऱ्या एका संघटनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार सध्या जगभरात मिथेनचे प्रमाण वाढत आहे या वाढणाऱ्या मिथेनमागे सर्वात मोठा हातभार हा जगभरात होणाऱ्या अन्न नासाडीचा आहे         या मिथेनमुळे जागतिक तापमान वाढते , प्रत्येक तपमानाची बाष्प सामावून घेण्याची एक मर्यादा असते काही कारणाने एखाद्यावेळी त्या विशिष्ट तापमानात सामावले जाऊ शकेल त्या मर्यादांपेक्षा  जास्त बाष्प हवेत असेल तर पाऊस पडतो हवेत किती बाष्प समाविष्ट होणार ? या तापमानाशी जवळचा संबंध असतो जास्त तापमान म्हणजे बाष्प सामावून घेण्याची मर्यादा जा