पोस्ट्स

ऑक्टोबर ७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान 3 नव्या बदलाचा वाटेवर ?

इमेज
      सध्या आपल्या भारतात एका बलात्कार च्या घटनेवरून वातावरण अतिशय तंग झाले असताना आपल्या भारताच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या शत्रू राष्ट्रात अर्थात पाकिस्तानमध्ये तीन  वेगवेगळ्या घडामोडींनी अतिशय वेग पकडला आहे . एक घडामोड आहे . पाकिस्तानातील सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी उघडणे ही आहे . दुसरी घटना आहे , पाकिस्तानचे माजी पंप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात नव्या खटल्याचा प्रारंभ करण्याची तयारी करणे आहे तरतिसरी घटना आहे , पाकिस्तानने अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशाला स्वतंत्र प्रांताचा(provience ) दर्जा देणे ही आहे .  पाकिस्तानातील  घटना आता सविस्तर बघूया . प्रथम गिलगिट बाल्टिस्तान विषयी बोलूया .               तर मित्रानो, सन 1947 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून काश्मीरच्या पश्चिमेकडील आणि वायव्य दिशेला असणाऱ्या भागावर पाकिस्तानने अनधिकृत कब्जा केल्याचे आपणास माहिती असेलच . या पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या वायव्य भागाला गिलगिट बाल्टिस्तान म्हणतात .सन 1970 पर्यंत हा विभाग पाकिस्तानच्या आझाद काश्मीरचा भाग होता