पोस्ट्स

जुलै १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला मानवाने

इमेज
    १२ जुलै २०२२ हा दिनांक जगाच्या इतिहासात सुवर्णक्षणांनी लिहला जाईल कारण या दिवशी मानवाने आपल्या सभोवताली अथांग पसरलेल्या विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला आहे नासा या संक्षिप्त रूपाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नॅशनल अरनेटिक्स अँड स्पेस एजन्सीकडून संचालित करण्यात येणाऱ्या जेम्स टेलिस्कोपने   छायाचित्र टिपले आहे   सदर फोटोमुळे आजपासून १३ अब्ज वर्षांपूर्वी किंवा विश्वाचा जन्म झाल्यनंतरचा   ८० कोटी वर्षानंतर विश्व कसे होते . याचा उलगडा होणार आहे . विश्वाचे सध्याचे वय बघता ८० कोटी वर्ष म्हणजे विश्वाचा बाल्यावस्थेतील हे फोटो म्हणायला हवेत      जेम्स टेलिस्कोप पृथ्वीपासून १५ लाख अंतरावरून आपल्या सभोवताली पसरलेल्या विश्वाचे निरीक्षण करणारी दुर्बीण आहे १००० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती खर्च , तब्बल २० वर्षांचा कालावधी बनवण्यासाठी तर १० , ००० पेक्षा जास्त वैज्ञानिक , अभियंते यांच्या अथक परिश्रमातून जेम्स वेब दुर्बिणीची निर्मिती करण्यात आली