पोस्ट्स

गुजरात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

६ महिने झाले राष्ट्रीय महामार्ग बंद

इमेज
      १२ जुलै २०२२ ही फक्त एक  तारीख नाहीये . आपल्या महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची ती तारीख आहे आज या घटनेला ६ महिने होत आले आहेत मात्र अद्याप हा महामार्ग बंदच आहे . नाशिकहून दिंडोरी सापुतारा मार्गे सुरतला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८  हाच तो राष्ट्रीय महामार्ग . सापुताऱ्याजवळ असणाऱ्या घाटात दरड कोसळून हा महामार्ग बंद झाला . महामार्ग बंद झाल्यावर त्या दिवशी माध्यमामध्ये याविषयी बातम्या आल्या त्यानंतर मात्र प्रस्थापित माध्यमांना बातमीविषयी अनेक महत्वाचे विषय असल्याने या विषयी त्यांनी मौनच बाळगले . फक्त दहा किलोमीटरसाठी ग्रामस्थांना मारावा लागतोय सत्तर किमीचा फेरा या सारख्या सनसनाटी मथळ्याचा बातम्याही त्यांनी दिल्या नाहीत . न जाणो या भागातील लोकांनीही आम्हाला गुजरातमध्ये जायचे आहे अशी मागणी केली तर काय करायचे ? त्यापेक्षा त्याचा संपर्क ठेवणारा राष्ट्रीय महामार्ग बंद असलेलाच बरा असा उदात्त विचार त्या मागे असेल कदाचित     मात्र हा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने नाशिकहून सुरतला जायला दिं...

सेमी कन्डक्टर म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
       नुकताच  सेमी कड्क्टर उभारणीचा  एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रास्तवित प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात हलवला गेला यावरून विविध पातळीवर राजकारण सध्या सुरु आहे . मला राजकारणाबाबत काहीही भाष्य करायचे नाही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ., या राजकारणाच्या मुळाशी जी बाब आहे ती म्हणजे सेमी कड्क्टर  याकडे  (मी सदर लेखन सर्वसाम्यांना विषयाची माहिती व्हावी यासाठी करत आहे त्यामुळे अनेक संकल्पना समजण्यसासाठी सोप्या व्हाव्यात यासाठी काही बदल केले आहेत.  कृपया इलेट्रीक इंजिनियर लोकांनी त्रास देऊ नये )          तर अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इलेट्रीक उपकरणात वीज नियंत्रणात आणणारा घटक म्हणजे  सेमी  कन्डक्टर  होय . जो घटक काही विशिष्ट परिस्थितीतच वीज पुरवतो . त्यामुळे जेव्हा उपकरणात विजेची गरज नसते त्यावेळी उपकरणास वीज पुरवठा होत नाही त्यामुळे होणारे नुकसान टळते . हे नुकसान विजेचे आणि विजेमुळे होणाऱ्या उपकरणाच्या नुकसानीचे दोन्ही असते . वीज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणत खर्च येतो तिच...

गुजरातमध्ये अवतरल्या पर्यावरण पूरक एसटीबसेस

इमेज
    मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या कवितेतील एक प्रसिद्ध वाक्य आहे, "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे".सध्या महाराष्ट्र एसटी सोडून अन्य राज्यातील एसटीने या वाक्यांमध्ये सांगितलेल्या बाबी सत्यात आणल्याचे दिसत आहे. एकेकाळी महाराष्ट्र एसटीची नक्कल इतर राज्यातील करायच्या एका अर्थाने महाराष्ट्र एसटी इतर राज्यांना विविध संकल्पना पुरवायची ,ज्याची नक्कल इतर राज्यातील एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे.मात्र कालांतराने वर सांगितलेल्या वाक्यातील पुढच्या अर्धा भाग देखील महाराष्ट्र एसटी सोडून अन्य एसटीने प्रत्यक्षात आणला आहे. आज महाराष्ट्र एसटी देशाला नविन संकल्पना देत नाहीये , तर एकेकाळी महाराष्ट्र एसटीची संकल्पनेची नक्कल करणाऱ्या तेलंगणा, गुजरात राज्याच्या एसटी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहे. आज सप्टेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये जून्या एसटी बसेसच्या इंजिनाचे रूपांतर अत्यंत पर्यावरणपूरक असलेल्या  बिएस 6 इंजिनामध्ये करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. गुजरात एसटीच्या सोशल मिडीया अकाउंटवर गेल्यास आज इतक्या जून्या एसटी बसेच्या इ...

अन्य एसटी वेगाने पुढे जात आहेत?आणि आपण!

इमेज
      एखाद्या व्यक्तीच्या परीस्थितीत प्रचंड बदल झाल्यास काय होतात तू , काय झालास तू ? असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्र एसटीविषयीच्या आणि आपल्या भारतातील इतर राज्यातील एसटीविषयक बातम्या ऐकल्या की , हे विधान आपल्या महाराष्ट्र एसटीला तर लागू पडत नाहीना ? असी दाट शंका येते.       एकेकाळी भारतातील इतर एसटी महामंडळाला महाराष्ट्र एसटी महामंडळाचा आदर्श होता. महाराष्ट्र एसटी सारखी सेवा आपल्या राज्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न एसटीने करावा , असे केंद्राकडून इतर एसटीला सांगण्यात येत असे. आपल्या बसेसच्या रंगसंगतीशी मिळतीजूळती रंगसंगती आंध्रप्रदेश एसटी ठेवण्याचा प्रयत्न करत असे. आपल्या महाराष्ट्र एसटीने 1962 आणि 1965 च्या युद्धात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी लष्कराला विक्रमी वेळात बस बांधून दिली होती. 1983 साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई खेळासाठी आलेल्या परदेशी खेळाडूंना आरामदायी प्रवास घडवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एसटीकडून विशेष बसेस बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या सर्वात आरामदायी बसेस म्हणून त्या ओळखल्या जात.आपण त्यांना हिरकणी किंव...

आपल्या एसटीमध्ये हे बदल कधी दिसतील ?

इमेज
    सध्या जग मोठ्या प्रचंड गतीने बदलत आहे .ज्याला आपल्या भारतातील विविध राज्य परिवहन महामंडळे देखील अपवाद नाहीत . नुकतेच गोवा  राज्याचा परीवहन महामंडळाकडून ( जे कदंब नावाने प्रसिद्ध आहे)  आणि गुजरात राज्याचा परीवहन महामंडळ  राज्याच्या परिवहन महामंडळाकडून दोन मोठे बदल करण्यात आले. त्यातील गोवा सरकारकडून त्यांचा परीवहन महामंडळात करण्यात येणारा बदल आपल्या महाराष्ट्राचा परीवहन सेवेत करावा, यासाठी खुप आधीपासून आपल्या एसटीमध्ये सुरु आहेत. मात्र आपल्या नंतर येवून गोव्याने यामध्ये बाजी मारली आहे         तर गोवा राज्य परीवहन महामंडळाकडून इलेट्रीक बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. गोवा राज्यातील म्हापसे या बस स्थानकावर त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे . या बस स्थानकातून गोव्यात आणि शेजारील कर्नाटक राज्यात बेळगाव निपाणी भागात बस वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गोवा एसटी प्रशासनाची महाराष्ट्रात सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुद्धा  इलेक्ट्रीक एसटी बस सेवा सुरु करण्याची तयारी होती. मात्र महाराष्ट्राने त्यास नकार दर्शवला असे प्रतिपादन गोव्याचे परीवहन मंत्र...

"उत्तमांची ते घ्यावे

इमेज
       काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे . काही अपरिहार्य कारणास्तव मी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला . या बस प्रवासादरम्यान मला आढळलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांच्या तिकिटावर देण्यात येणारी माहिती . मित्रानो त्या तिकिटावर मला मी प्रवास करत असणाऱ्या ठिकणादरम्यान किती किलोमीटर अंतर आहे , याची माहिती देण्यात आली होती . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकिटांवर अशी माहिती देण्यात येत नाही . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन बसेसच्या तिकिटांवर बसेसचे टप्पे देण्यात आलेले असतात . एका टप्यासाठी अमुक इतकें भाडे त्यामुळे त्यामुळे एकूण टप्पे गुणिले एका टप्याचे भाडे बरोबर इतके भाडे अशी रचना असते . माझ्या मते आर्थिक सोयीसाठी आपली पद्धत अधिक सयुक्तिक असली तरी प्रवाश्यांच्या एकूण सोयीसाठी प्रवाश्याना आपण एकूण किती अंतर जाणार आहोत हे कळणे चांगले नाही का ? गाडयांची सरासरी गती लक्षात घेऊन आपणास किती वेळ लागणार आहे ? याची माहिती त्यामुळे सहजतेने लक्षात येते .            समर्थ रामदास स्वामी  यांचे "उत...

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

इमेज
                       मी नुकतीच म्हणजे वार रविवार, 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा )या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली, ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी  शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी, सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला  जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150किमीवर असणाऱ्या बडोदा (गुजराती उच्चार वडोदरा ...

अन्य राज्य परिवहन महामंडळ आणि आपली MSRTC

इमेज
                    नुकताच काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्राची एसटी बस सोडून प्रत्येकी एकदा  कर्नाटक आणि गुजरात राज्यच्या एसटी बसने प्रवास करावा लागला . या प्रवाश्यादरम्यान मला वाढलेली गोष्ट म्हणजे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची रचना . .आपल्या महाराष्ट्राच्या बसेसपेक्षा कर्नाटकाच्या बसेस लांबीने थोड्या मोठ्या होत्या . तसेच त्या बसेसमध्ये एका रांगेत 5आसने होती . गुजरातची एसटी आपल्या महाराष्ट्र्राच्या बसेसपेक्षा लांब नव्हती याही बसमध्येएका रांगेत 5आसने होती . आपल्या महाराष्ट्राच्या बसेसमध्ये पूर्र्वी 5आसने होती . मात्र कालांतराने आरामदायी प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या हेतून आपल्या बसेस मध्ये एका रांगेत फक्त 4असणे ठेवण्यात येऊ लागली . मात्र या बसेसमध्ये अजून एका रांगेत पाच आसने आहेत . आपली आसने कमी का करण्यात आली ? पूर्वीप्रमाणे एका रांगेत पाच आसने असावीत . यासाठी मी एसटीच्या एका अधिकाऱ्याशी  नंतर संवाद साधला असता त्याने आपली भौगोलिक परिस्थिती कर्नाटक आणि गुजरात पेक्षा भिन्न असल्याने ते ...

स्पर्धापरीक्षा घोटाळा माध्यमात न आलेला

इमेज
                                   सध्या समस्त भारत त्यातही भारताच्या पूर्व भाग नागरिकत्वाच्या विधयेयकामुळे आगीत होरपळून जात असताना , भारताचा पश्चिम भागही वेगळ्या एका कारणांमुळे तरुणाईचा रोषाला बळी पडत आहे . पश्चिम भागातील तरुणाईचा रोषाला कारणीभूत आहे , एका राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या एका परीक्षेत झालेला अभूतपूर्व गोंधळ, ज्यामुळे ती परीक्षाच अखेर रद्द करण्याची वेळ त्या राज्य लोकसेवा आयोगावर आलेली आहे . या निमित्याने सर्वच राज्य लोकसेवा आयोगाचा  कार्यपद्धतीचा एकंदरीत आढावा घेतला असता येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही असे खेदाने म्हणावे लागेल .                    मित्रानो , भारतीय संविधानाच्या कलम 317 मध्ये या राज्य लोकसेवा आयोग प्रणालीचा  स्पष्ट उल्लेख करण्यात आला असताना , त्यांची दुर्दशा होणे वाईट आहे . वेळेवर परीक्षा न होणे , परीक्षेचा निकाल वेळेवर न लागणे , लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सरकारकडून नि...

मला भावलेले सुरत (भाग 2)

इमेज
                                    मी सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . रस्तेमार्गे होणाऱ्या कंटाळवाण्या प्रवासावर तोडगा म्हणून मी पूर्वी विविध माध्यमे वापरत असे , ज्यामध्ये विविध प्रकारच्या आणि मालकीच्या  बसेसचा समावेश असे . असेच एका प्रयोगात मला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत या बसचा शोध लागला . मला त्यांची आसनव्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य खाजगी बसेसपेक्षा अधीक  आरामदायी वाटल्याने आता मी शक्यतो नाशिक पुणे प्रवास याच बसने करतो . सातत्याने प्रवास केल्याने त्या बसच्या कर्मचाऱ्यांशी माझी मैत्री झाली आहे . त्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी एकदा  त्या बसने सुरत प्रवास देखील केला त्याचे अनुभव तुम्ही या ब्लॉग च्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . त्याच प्रवासादरम्यान मला नाशिक सुरतच्या लोकप्रिय अश्या सापुतारा मार्गाबरोबर पेठ धरमपूर बलसाड  हा  मार्ग देखील माहिती झाला आणि माझी त्या मार्गाने सुरत पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता नि...

मला भावलेले सुरत . (भाग 1)

इमेज
                  केल्याने देशांतर  शहाणपण येते असे आपल्याकडे म्हणतात. . याच उक्तीला जागत  मी नुकताच  नाशिक- सुरत -भिवंडी आणि परत नाशिक  प्रवास केला त्याची ही कहाणी .                               माझा प्रवास सुरु झाला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने[ अर्थात बस जरी पुण्याहून सुरतला जाणारी असली तरी मी त्यात स्थानापन्न झालो ते नाशिकला] जी नाशिकहून पारंपरिक मार्गाने अर्थात दिंडोरी सापुतारा मार्गाने .  मी रविवार सुरत दर्शनासाठी निवडल्याने मला सुरतच्या  सुप्रसिद्ध हिरे आणि कापड बाजाराला दर्शनाला मुकावे लागले. असो जे होते ते चांगल्यासाठीच                                                        सुरतची पर्यस्थान स्थळे माहित नसल्याने मी शहर फिरण्याचा द्रूष्टीने शहर बस वाहतुकीचा ...

या लोंढ्याना आवरायला हवे (भाग २ )

इमेज
                                                                         मित्रानो गेल्या  काही कालावधीत मी दोनदा नाशिक ते सुरत या दरम्यान प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला आपली महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्याची एसटी या दरम्यान काही फरक आढळले . ते तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखमालेतील हा दुसरा भाग , तुम्ही पहिला भाग या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता .                                        मला आढळलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य राज्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात येण्याचे  अति प्रचंडप्रमाण आणि त्या तुलनेत आपल्या एसटी बसेस अन्य राज्यात जाण्याचे नगण्य प्रमाण . आपण रात्री पुण्याच्या स्वारगेटवर  बघा पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या आपल...

या लोंढ्याना आवरणे ही काळाची गरज

इमेज
                             नुकताच मी  काही कामनिमित्य भिवंडी येथे गेलो होतो.  तेथील एसटी स्टॅण्डवर मी गुजरात राज्य परिवहनाची एक बस बघितली . मला उच्छूकता वाटल्याने मी बसेसबाबत आधी चौकशी केली असता , मला समजले की . ती सुरत ते मुंबई सेंट्रल या दरम्यान भिवंडीमार्गे  धावणारी  बस होती . आपण जर नकाश्यात सुरत ते मुबई सेंट्रल या दरम्यानच्या रस्ता बघितला तर त्यात कुठेही भिवंडी येत नाही . मग ही बस भिवंडीवर आली कुठे ? तर जो सुरत ते मुंबई दरम्यान असणाऱ्या मुंबई ते दिल्ली महामार्गावरून   मुंबईपासून  हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चीकानेर येथून हि बस वाडामार्गे भिवंडी येथे जाते तिथून ठाणे मार्गे मुंबईत येते , आहे कि नाही, गंमत .                                              याचा आधी मी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर गुजरात राज्य परिवहनाची अहमदाबाद ते कोल्हापूर अशी स्लीपर व्होलो...

महाराष्ट्रत्तेर एस टी एक समस्या

इमेज
नुकतीच  मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला रात्री भेट दिली . तेथील दृश्य बघून  मी थबकलोच,  आपण महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये असल्यासारखा भास व्हावा असे ते दृश्य होते .  महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील शहर असूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटकच्या बसेसची संख्या जास्त होती . मागे मी हा प्रकार कोल्हापूर बसस्थानकावर बघितला होता .मात्र  कोल्हापूर कर्नाटक  सीमेपासून निव्वळ २५ किमी असल्याने मी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता . त्यानंतर याविषयीची अधिक माहिती मिळावी म्हणून कर्नाटक राज्य परिवहनाच्या  संकेतस्थळावर भेट दिली असता तेथील माहिती झोप उडवणारी होती. कर्नाटक सरकार राज्याबाहेर दुसऱ्या राज्यातील ४० मार्गावर सेवा पुरवते या ४० पैकी २९ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत .  मागे मी एकदा कराडला गेलो असता मी बेळगाव ते नीरा या मार्गावरील कर्नाटक परिवहन महामंडळाची बस ब घितली होती . मित्रानो नीरा हे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत असणारे गाव आहे . म्हणजेच तुम्ही समजू शकता कर्नाटक किती आतापर्यंत पोहोचले आहे . नाशिकहून बेळ...

महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्यातील एसटी एक तुलना

इमेज
                मी नुकताच पुणे नाशिक कर्नाटक परीवहन महामंडळाच्या व्होल्वो गाडीने  तर नाशिक पुणे गुजरात परीवहन महामंडळाच्या साध्या बसने  प्रवास केला. त्यासाठी मला  अनुक्रमे 460 आणि 260 रुपये लागले .  त्यावेळी आलेल्या अनुभवाचे हे कथन               महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या शिवशाही या बसचे नाशिक पुणे भाडे 410 रुपये आहे. याउलट अत्यंत कमी कर असल्याने कर्नाटकच्या व्होल्वाबस चे भाडे 460 रुपये आहेत. आता नाशिक पुणे शिवनेरी बंद आहेत. मात्र त्या जेव्हा चालू होत्या तेव्हा त्यांचे भाडे 600 रुपये होते. शिवनेरी बस बंद केल्यावर 18% भाववाढ करण्यात आली . त्यानुसार त्यांचे भाडे 108 रुपयांनी वाढून 708 रुपये झाले असते . मी गुजरातच्या बस डायव्हर यांच्यासी एकदा बोललो असता त्यानी सांगितले होते की "आम्ही महाराष्ट्रात ज्या  सेवा देतो  त्यांचे वेळापत्रक  महाराष्ट्र तयार करतो  जर आम्ही तयार केले तर तुमचे डब्बे मोकळे फिरतील...