पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

इमेज
जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east)या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते‌. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व  याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्या