पोस्ट्स

फेब्रुवारी ७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक

इमेज
                   सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतो .  व्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहे .  या पार्श्वभूमीवर या विषयाची  मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे " युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा  विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .              पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने न करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात  सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा  झालेल्या  जैविक हल्ल्याची माहिती देण्