पोस्ट्स

एप्रिल १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इम्रान खान यांना तर हटवले पुढे काय ?

इमेज
                पाकिस्तानात गेल्या काही महिन्यापासून सुरु असणारा सत्ता संघर्ष १० एप्रिलला काही प्रमाणत संपला . गेल्या काही म्हन्यांपासून सरकाविरोधी पक्ष एकत्र येऊन सातत्याने सरकार पाडण्याचे प्रयत्न करत होते .एकमेकांच्या पूर्णतः  विरोधात राजकीय विचारधारा असलेले पक्ष इम्रान खान हटवा या एकाच ध्येयाखाली एकत्र आले  होते त्यासाठी त्यांनी पाकिस्तान डेमोक्रेक्तिक अलायन्स स्थापन केली होती ज्याच्या मार्फत देशभरात आंदोलने करून इम्रान खान यांच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला . ज्याला या अखेर यश आले.,  आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पदच्युत झाले . या नवनियुक्त पक्षाच्या ठोस असा कार्यक्रम देशाला पुढे नेण्याचा कोणताही एक कार्यक्रम नाही पुढे कशी वाटचाल करायची याबाबत ठाम भूमिका नाही आपल्या भारतात आणीबाणी उठल्यानंतर डावे समाजवादी पक्ष आणि जनसंघ  पक्ष्यासारखे अति उजवे पक्ष एकत्र आले होते तसेच काहीसे चित्र सध्या पाकिस्तानात तयार झाले आहे जनता पक्षात जसा अंतर्विरोध ठासून भरला होता तास तो विद्यमान शरीफ यांच्या सरकारमध्ये सुद्धा आहे . पाकिस्तानातील पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला जेमतेम दीड वर्