पोस्ट्स

एप्रिल १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मांगल्याचे प्रतिक गुढीपाडवा

इमेज
          गुढीपाडवा, हिंदू धर्मियांचे नविन वर्ष सुरु होण्याचा दिवस,  हिंदू धर्मियांचा साडेतीन शुभमुहुर्तांपैकी पहिला मुहुर्त . राशीचक्रातील पहिली रास असणाऱ्या मेष राशीत सुर्याचे भासमान भ्रमण ज्या महिन्यात होते, त्या महिन्याचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने समस्त वाचकांना नववर्षाभिनंदन .नुतन वर्ष आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करणारे ठरो, ही मनोकामना. मागचे वर्ष कोरोनामुळे अवघड गेले, मात्र नुतन वर्ष ते अपयश मागे सरणारे ठरो, ही इश्वरचरणी प्रार्थना          आजच्या दिवसापासून मराठी भाषिकांचे शालीवाहन शक तर उत्तर भारतीयांचे विक्रमसवंत सुरू होते. सध्या सुरु असलेल्या इसवी सनातून 78 वजा केले की, शालीवाहन शकाचा क्रमांक मिळतो . सध्या इसवी सन 2021 सुरु असल्याने या गुढीपाडव्यापासून शालीवाहन शक 1943  सुरु होईल. या दिवशी कडुलिंबाचे सेवन करुन घराबाहेर गुढी उभारण्याची प्रथा आहे. आजच्या दिवसापासून वसंत ऋतू सुरु होतो. वसंत ऋतूमध्ये पानगळीच्या  झाडांना नवी पालवी फुटते.सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार होते, ज्याचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी व्याखानमालांचे आयोजन करण्यात येते .(सध्याचा अपवाद करुया)         घराबाहेर