पोस्ट्स

फेब्रुवारी १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकमध्ये रंगणार राज्य बुद्धिबळ स्पर्धेचा थरार

इमेज
     नाशिकला क्रीडापटूंची मोठी परंपरा आहे नाशिकने ग्रँडमास्टर विदित गुजराथी, आशियाई शालेय बुद्धिबळ विजेती प्रचिती चंदात्रे सावरपाडा एक्सप्रेस  कविता राऊत, दत्तू भोकनळ यांच्यासह अनेक नामवंत कुस्तीपटू आणि  क्रिकेटवीर दिले आहेत मात्र स्पर्धा आयोजनात नाशिक काहीसे मागे पडले आहे गेल्या कित्येक वर्षात कोणत्याही खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये रंगलेली नाही मात्र हा कलंक आता पुसला जाणार आहे कारण    येत्या शनिवारी रविवार अर्थात १९ आणि २० फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना महाराष्ट्राचा  राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठीचा संघ निवडण्यासाठी स्पर्धा घेणार आहेत ज्या ठिकाणी  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्न अश्या ३२ जिल्हा बुद्धिबळ संघटनांकडून निवडण्यात आलेले ४ पुरुष आणि ४ महिला खेळाडू आपले बौद्धिक चातुर्य दाखवत महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी एकमेकांशी बुद्धिबळाचा पटावर झुंज देतील           नाशिकमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथी,  आशियाई  शालेय बुद्धिबळ विजेती  प्रचिती चंदात्रे  यांसारखे अनेक नामवंत बुद्धिबळ खेळाडू आहेत नाशिकमध्ये बुद्धिबळ खेळ शिकवण्य