पोस्ट्स

मार्च १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दहा वर्षे महाप्रलयानंतरची !

इमेज
  ही गोष्ट आहे 2011 मार्च 11 ची. स्थळ जपान देश. स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणे तीनचा सुमार (जागतीक प्रमाणवेळेनुसार सकाळी पावणे सहा वाजता/भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकरा ) कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जपानमध्ये तब्बल 9.1  रिक्टर स्केलचा भुकंप झाला.  जपानमधील आतापर्यतचा सर्वात मोठा भुकंप म्हणून या भुकंपाची नोंद घेण्यात आली. यामुळे  जपानचे उत्तरेकडचे बेट काही सेंटीमीटर अमेरीकेकडे सरकले. मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली. जपानच्या अनेक अणूविद्यूत प्रकल्पामध्ये त्यामुळे समस्या निर्माण झाल्या .फुकिसीमा  या अणूविद्यूत प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाल्याने समस्येत वाढ झाली. या दुर्घटनेला आज 10 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.                  या नंतरच्या दहा वर्षात जपान पुन्हा एकदा अशरक्षः राखेतून उभा राहिला. नव्याने सुरवात करत भारताला बुलेट ट्रेन आदी विकासकामासाठी साह्य करत आहे. तसेच  लष्करासाठी  अमेरीकेवरील अवलंबत्व कमी करत स्वतःचे लष्कर उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेही जपानने या आधीही फिनिक्स पक्षाप्रमा