पोस्ट्स

एप्रिल २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कथा एका दुर्बिणीची !

इमेज
 आज 24एप्रिल 2021 अर्थात अवकाशाचा वेध घेण्यासाठी हबल दुर्बिण अंतराळात सोडली, त्याला 31 वर्षे पुर्ण होण्याचा दिवस. 24 एप्रिल 1990 रोजी अवकाशात हबल दुर्बिण सोडण्यात आली. पृथ्वीवरच्या विविध अडथळ्यांवर मात करता यावी,या उद्देशाने निर्माण केलेली दुर्बिण हबल.मानवाचा अंतराळातील डोळा म्हणजे हबल टेलीस्कोप . या टेलीस्कोप मुळे खगोलशास्त्रात अनेक आश्चर्यकारी शोध लागले आहेत.या दुर्बिणीला 31 वर्षे झालेली असली तरी अजून काही काळ ती उत्तम सेवा देईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे     हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.     इटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्‍या