पोस्ट्स

जानेवारी १२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

योद्धा संन्यासी

इमेज
                                 मरगळलेल्या समाजाचा देश जो  स्वतःचे सत्व विसरलेला होता ,त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत  नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे  स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश .                        १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .                 स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप  गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे             स्वामी विवेकानंदानी पाशात्य देशात भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली याची सुरवात झाली . ती सर्वधर्म परिषद

साने गुरुजी आम्हाला माफ करा

इमेज
                 साने गुरुजी यांनी भाषाभगिनी संकल्पना मांडली. ज्या अंतर्गत विविध भाषेतील साहित्यीकांनी एकत्र येणे अपेक्षीत होते . नयनतारा  सहगल यांनी 92व्या मराठी साहित्य संमेलन हजेरी लावली असती तर ही संकल्पना पुढे आणता आली असती जी  त्यांच्या अनुपस्थीमुळे प्रत्यक्षात आलेली नाही मराठीतील उत्तुंग प्रतिभेचे लेखक असलेल्या साने गुरुजींच्या कल्पनेची पायमल्ली मराठी भाषिक व्यक्तींनीच  केली या इतके दुर्देवी घटना खचितच दुसरी कोणती असेल? साने गुरुजी आम्हाला माफ करा  गुरुजी एका भारतीय  भाषेतील पुस्तके भारतातील अन्य भाषेत अनुवादित करून  भाषा भाषांमधील लोकांनी परस्पर सुसंवाद करावा किती उत्तम कल्पना तुम्ही मंडळी त्यामुळे बंगाली संस्कृतीचे वातावरण असणारा कबुलीवाला हि कथा मराठी लोकांना अनुभवयास मिळाली . अन्य भाषेतील अनेक सुंदर सुंदर पुस्तके त्यामुळे मराठीत अनुवादित झाली अन्य भाषिक साहित्यांकांची पुस्तकांची मौज त्यामुळे मराठी रसिकांना चाखता आली . मात्र मराठीतील किती पुस्तके अन्य भाषेत भाषांतरित झाली हा संशोधनाचा विषय ठराव इतकी दयनीय अवस्था याबाबत आहे. या बाबत मी  एकदा फेसबुकवर माजी सनदी अधिकारी अविनाश