पोस्ट्स

मार्च १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कधी येणार आपल्या अजेंड्यावर हवामान बदल?

इमेज
             सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर रशिया युक्रेन युद्धाबाबतचे अत्यंत हास्यास्पद वाटाव्या अश्या बातम्या किंवा विविध  राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप  आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या बाबत असणाऱ्या बातम्यांचा महापूर आपल्याकडे आणत असताना आपल्या महाराष्ट्रातील एक खूप मोठा भूभाग बेमोसमी पावसामुळे त्रस्त झालेला आहे  आणि हा भूभाग या २०२२ या वर्षीच बेमोसमी पावसाने त्रासलेला आहे असे नाही गेल्या काही वर्षाच्या इतिहास बघितला तर आपणास महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे .नारद भगवान विष्णूंना विचारताय .भगवान हे काय ? त्यावेसेस नारद मार्च एंडिंग आहे हिशोब पूर्ण करायला लागणारच ना ?असे उत्तर भगवान  विष्णू नारदांना देत आहेत  किंवा स्वेटर घालू कि रेनकोट?  असा प्रश्न मला पडलाय हिवाळा अधिक पावसाळा बरोबर हिवासाळा हा ऋतू असे अनेक व्यगंचित्र कोट्या आपण समाज  माध्यमांमध्ये अनेक वर्षांपासून करत आलेलो आहोत . मात्र तरीही समाजाच्या अजेंडयावर हवामान बदल हा विषय दिसत नाहीये . नाही म्हणायला काही प्रमाणात सरकारी पातळीवर , काही गैर सरकारी सामाजिक संस्था हवामान बदल या बाबत काही