पोस्ट्स

मार्च २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकमेका साह्य करु

इमेज
" एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ", असे आपणाकडे सुप्रसिद्ध वचन आहे. मानवाने एकमेकांना मदत केल्यास सगळ्यांची प्रगती होते, असा या वचनाचा अर्थ आहे. हे वचन ऐकायला खुप छान वाटत असले, तरी आपल्या भारतीयांचे वागणे तसे नाहीये, असा निष्कर्ष एका जागतिक अहवालातून स्पष्ट होत आहे .  तर मित्रांनो,  युनाटेड नेशनच्या एका सहयोगी संस्थेमार्फत 20 मार्च 2021रोजी 7 निष्कर्षाचा आधारे जगातील आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली. या 7 निष्कर्षांपैकी एक निष्कर्ष होता, त्या देशातील नागरीकांना ते वैयक्तिक अडचणीत असताना स्वतःच्या मित्राकडून अथवा नातेवाइकांकडून मदत मिळेल याबाबत किती खात्री आहे. नागरीकांना या बाबत 0 ते 10 या मोजपट्टीवर गुण देयचे होते.0 गुण म्हणजे काहीच मदत मिळत नाही. 10 म्हणजे खुप खात्री आहे. या स्केलवर भारताचे प्रदर्शन खुप खुप वाइट आहे. 156 देशांच्या यादीमध्ये भारताचा या निकर्षावर  क्रमांक आहे 152 . {अहवालामध्ये प्रत्येक निकर्षावर आधारीत देशांची स्वतंत्र यादी देण्यात आली आहे} उरलेल्या 4 देशांमध्ये व्हेनुझ्युउला, हैती, दक्षीण सुदान , अफगाणिस्तान हे देश आहे. म्हणजेच आपण बघू शकता की, हे देश