पोस्ट्स

डिसेंबर ५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

इमेज
         आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.           मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय संपले समजून अखेरचा उपाय म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडला जातो. एखाद्या व्यक्त