पोस्ट्स

जुलै १५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण कधी बघणार या प्रश्नांकडे

इमेज
काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच  आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा  या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला  त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज  एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा  भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना  का  दिसत नाही                भारतातील वृत्तवाहिन्या मनोरंजनाच्या बातम्या अधिक देतात असे माझे निरीक्षण आहे . ज्यामध्ये अभिनेत्यांची नुकतीचरांगू  आणि चालायला शिकणारी  बाले मोठे