पोस्ट्स

सप्टेंबर ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

29 वर्षापूर्वीची ती काळरात्र -

इमेज
 दिनांक 9 सप्टेंबर 2022   रोजी आपण अनंत चतूर्दशी साजरी करत आहोत .  या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील दहा दिवसांची यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 29   वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , .गणरायाचे विसर्जन करून ते झोपे गेले ते कायमचेच.   लातूर  किल्लारी चा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे   मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 29 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. .लातूर किल्लारी परीसराला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील धारवाड या परीसरात भुगर्भात असणाऱ्य

भिकारी ते प्रबळ.30वर्षाची भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल

इमेज
 नूकताच  भारतीय अर्थव्यवस्थेने ग्राँस डेमाँस्टिक प्राँडक्टचा विचार करता जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला. हा तोच भारत आहे , जो आजपासून 31 वर्षापुर्वी  आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. देशात  हाताच्या बोटावर मोजता येतील असे मोजकेच काही आठवडेच  नैसर्गिक इंधन आयात करू शकू ,इतकेच परकीय चलन होते. देशाच्या बँकिंग प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या बँकेकडे अर्थात रिझर्व.बँकेकडे असणारे सोने जपान , युके आणि स्विझरलँडच्या बँकेकडे गहाण टाकण्याची वेळ ज्या देशावर आली होती.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसुद्धा ज्या देशाला कर्ज देण्यास तयार होत नव्हती.त्या देशाने 30 वर्षात ग्राँस डेमोक्रॅटिक प्राँडक्टचा विचार करता, जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा पल्ला गाठला आहे. जे खरोखरीच कौतूकास्पद आहे.  पी नरसिंहराव यांनी डाँ. मनमोहनसिंग यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नाचे गोडफळ म्हणजे आजचे भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र. त्यावेळेस जे बदल राबवणे ,म्हणजे स्वतःची राजकीय आत्महत्या करणे, असे समजण्यात येत होते.ते कठीण बदल आपल्या अर्थव्यवस्थेत रुजवत केलेल्या प्रयत्नांमुळे आपली अर्थव्यवस्था या स्थितीप