पोस्ट्स

एप्रिल ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंकन गुंत्यांची साखळी

इमेज
             आपल्या दक्षिणकडील डोळ्यातील अश्रूच्या आकारातील देश अर्थात श्रीलंका या देशातील नागरिकांच्या डोळ्यातून  खरोखर अश्रू येण्यासारखी त्यांची स्थिती झाली आहे हे एव्हाना आपणास माहिती असेलच . यामागची अनेक कारणे आपणास व्हाट्सअप वगैरे समाजमाध्यमातून  आपणस स्वतंत्ररित्या माहिती देखील असतील जसे श्रीलंकन सरकारने तेथील नागरिकांना दिलेल्या अनेक कर सोयीसवलती , चीनचा कर्जाचा डोंगर, त्यांची परदेशी गंगाजळी  आटणे वैगरे.  मात्र यापैकी  . कोणत्याही एकाच कारणांमुळे त्यांची अशी स्थिती झालेली नाही . तर या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम स्वरूप म्हणजे श्रीलंकेवर आलेले संकट हा एकत्रित परिणाम कशा आहे हे आता बघूया         पहिल्यांदा कर्जाचा विचार करूया कोणत्याही देशाने कर्ज घेणे यात काहीहीही वावगे नाही अमेरिकेचाच विचार करता अमेरिकेवर जगातील कित्येक देशांच्या एकत्रित कर्जापेक्षा अधिक कर्ज आहे . आपल्या भारतावर देखील मोठ्या प्रमाणात कर्ज आहे कर्ज घेणे यात काह्ही वाईट नाही किंबहुना कर्ज घेतल्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्था टिकून आहेअसे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी स्थिती आहे . अमेरिका भारत आदी देशच कर्ज घेतात असे न