पोस्ट्स

नोव्हेंबर २७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत अफगाण मैत्री नव्या वळणावर

इमेज
        मित्रानो भारत आपल्या शेजारील देशांशी असणारे मैत्रीचे नाते  अधिक दृढ करत आहे, हे आपणास माहिती आहेच  बांगलादेश,  म्यानमार या देशांशी ईशान्य भारताच्या विकासात भागीदार म्हणून तर श्रीलंका नेपाळ मालदीव भूतान या देशांशी चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी तर पाकिस्तानला कोंडीत पकडण्याबरोबर, मध्य आशियातून   नैसर्गिक   ऊर्जा संसाधने मिळण्यासाठी अफगाणिस्तान बरोबर भारत मैत्री वाढवत आहे हे आपणास ज्ञात आहेच . आतापर्यंत मी बांगलादेश , म्यानमार, भूतान , नेपाळ, मालदीव, श्रीलंका  आदी देशांशी भारताचे नव्याने विस्तारित होणारे मैत्री संबंध आपण अभ्यासले आहेत . ज्यांना ते वाचायचे असतील त्या लोकांना शोधणे सोईस्कर व्हावे या साठी त्याचा लिंक या लेखाच्या खाली देत आहे . आज मी बोलणार आहे  अगणिस्ताना विषयी .       अफगाणिस्तान महाभारतातील  शकुनी मामाचा देश, फक्त बंगालमधीलच नव्हे तर भारतातील महत्वाचे साहित्यिक असणाऱ्या रवींद्रनाथ टागोर  यांच्या कथेतील कबुलीवाल्याचा देश, 1761 साली  भारतावर आक्रमण करून मराठी भाषिकांचा लाजिरवाणा पराभव करणाऱ्या अब्दालीचा देश, 12व्या  शतकापासून  भारतावर आक्रमण करणाऱ्या विविध आक