पोस्ट्स

जून ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लंकेचा गुंता अजूनही जैसे थे

इमेज
         लंकेचा गुंता अजूनही जैसे थेच असल्याचे तेथून  येणाऱ्या बातम्यांमधून दिसत आहे तेथील सरकारच्या आंतराष्ट्रीय नाणेनिधीशीं सुरु असणारी बोलणी सुरूच आहे सध्या प्राथमिक स्वरूपाची बोलणी पूर्ण झाली असून आता अधिक व्यापक स्वरूपाची बोलणी होणार असल्याचे वृत्त द हिंदू मध्ये आले आहे . विद्यमान सरकारने त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्प अजून जाहीर केलेला आंही येत्या काही आठवड्यात तो सादर झाल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल अर्थसंकल्प नक्की कधी मांडणार याबाबत अजून कोणतीही घोषणा विद्यमान विक्रमसिंघे सरकारकडून करण्यात आलेली नाही मात्र आम्ही लवकरात लवकर श्रीलंकेला पूर्वपदावर आणणारा अर्थसंकल्प मांडू अशी घोषणा करण्यात आलेली आहे विद्यमान पंतप्रधान जे अर्थमंत्री सुद्धा आहेत ते या संकटातून श्रीलंकेला कसे बाहेर काढतात हे बघणे आवश्यक आहे  तसे श्रीलंकेचे संकट मोठे आहे जे एक दोन महिन्यात दूर होणे जवळपास अशक्य आहे मात्र तरी देखील श्रीलंकन आर्थिक समस्या दूर होण्याची गती काहीशी सुस्तावालेली आहे आजमितीस श्रीलंकन सरकारची आंतरराष्ट्रीय नाणेनिधींसी होणारी बोलणी अंतिम टप्यात येणे आवश्यक होते जे बऱ्याच अंशी मागे पडले आहे