पोस्ट्स

नोव्हेंबर ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब बुद्धिबळाचा (भाग १६ वा )

इमेज
   सध्या आपल्या भारतासह जगभरातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या नव्या म्युटनला यशस्वीपणे तोंड कसे देयचे? याचे नियोजन केले जात असताना,  दुबई मध्ये एक वेगळेच युद्ध रंगले आहे. दोन एकतीस वर्षीय तरुण योद्धे यात आपले सर्वस्व झोकुन जिंकण्यासाठी जिवाचे रान कत आहे. या दोनमधील एक जण आपले सिंहासन वाचवण्यासाठी तर दुसरा त्या सिंहासनावर आरुढ होण्यासाठी आपले बुद्धीचातूर्य दाखवत त्याच्याशी लढाई करत आहे. हे योद्धे आहेत बुद्धिबळाचा आजमितीस असणारा विश्वविजेता नेदरलँडचा नागरीक  मँग्नस कार्लसन. जो गेल्या 4 वर्षापासून बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट आहे. आणि रशियाचा बुद्धिबळपटू असणारा अँन नोपोमनिची जो युरोपिय स्पर्धेचा दोन वेळेचा विजेता विजेता आहे.    26 नोव्हेंबर पासून ते एकमेकांना विश्वविजेतेपदासाठी आव्हान देत आहेत.  आतापर्यंत(30 नोव्हेंबर सायंकाळ) 4 खेळ झाले आहेत. या स्पर्धेआधी मँग्नस कार्लसन यांनाच संभाव्य विजेता मानण्यात येत होते,मात्र आव्हानवीर अँन नोपोमनिची यांनी विश्वविजेत्याला चांगली झुंज दिली आहे. हा लेख लिहण्यापर्यत झालेल्या 4 डावामध्ये चारही डाव बरोबरीत सुटल्याने यातील रंगत प्रचंड वाढली आहे. या दोघांमधी