पोस्ट्स

जुलै २३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

46व्या अमेरिकी अध्यक्षांचे बिगुल (भाग 4 )

इमेज
            सध्या समस्त जगत  करोनाच्या भीतीत जगत असताना जगात अनेक घडामोडी घडत आहेत . नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार ठरला जाणे , हि त्या यापैकीच एक होय . जगातील सर्वात बलाढ्य अश्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या या देशाच्या 46 व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते. ,याकडे समस्त अमेरिकेचे लक्ष लागलेले आहे . गेल्या वर्षभरापासून सुरु असणारी ही प्रक्रिया आता अंतिम  टप्यात आली आहे . ही प्रक्रिया कशी असते ? याबाबत मी याच ब्लॉग मध्ये आधीच्या तीन पोस्ट मध्ये सांगितली आहे . ज्यांना ती बघायची असेल त्यांनी या पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे .            तर मित्रानो , डेमोक्रेटिक पक्षातर्फे नुकतीच JOE  BIDEN  याना उमेदवारी जाहीर झाली आहे . रिपब्लिक पक्षातर्फे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानाच  उमेदवारी देण्यात येणार आहे . डेमोक्रेटिक पक्षातर्फ़े अनेक महिला उमेदवार अध्यक्षपदासासाठी उत्सुक होत्या , त्यामुळे जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या अध्यक्षपदी महिला येण्याची शकयता होती . मात्र  अमेरिकेत झालेल्या प्रायमरी आण