पोस्ट्स

मे ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगात अशांतता निर्माण करणाऱ्या घटनेविषयी!

इमेज
सध्या आपल्या भारतात कोरोना रुग्ण वाढीने भयावह परीस्थिती निर्माण केली असताना पश्चिमी आशिया (ज्याला मध्यपुर्व किंवा आखाती देश सुद्धा म्हणतात) प्रदेशात अत्यंत तणावाची, स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. आणि ही स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे इस्राइल या देशाने केलेल्या एका आक्रमक कृतीमुळे.        तर मुस्लिम बांधवांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थळ असलेल्या अल अस्का मशिदीवर इस्राइलने  शुक्रवारी नमाजपठाण चालू असताना आपले शस्त्रधारी सैन्य घूसवले. आणि काही लोकांची धरपकड केली . ज्यामध्ये 200जण जखमी झाले , त्यातील 90जण अतिशय गंभीर असल्याचे वृत्त CNN ने दिले आहे. मुस्लिम समाजबांधवांमध्ये मक्का आणि मदिनानंतर तिसरी पवित्र जागा म्हणून अल अस्का मशिद ओळखली जाते. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमद्द पैंगबर  यांनी या जागेवरून स्वर्गारोहण केले असी श्रद्धा आहे. हे ठिकाणी जेलूसरेमच्या ओल्ड सिटी भागात येते.याच ओल्ड सिटी भागात ज्यू धर्मियांसाठी पवित्र असणाऱ्या मंदिराचे अवशेष असणारी भिंत आहे. तर ख्रिस्ती धर्मसंस्थापक येशू खिस्त यांचा जन्म देखील याच शहरात झाला. असी खिस्ती धर्मियांची श्रद्