पोस्ट्स

मानसशास्त्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मानसिक आरोग्य मुलभूत अधिकार

इमेज
  मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्य अत्यंत महत्त्वाच्या   घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे   १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन.   १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो सन २०२३ची संकल्पना आहे Mental health is a universal human right”    उत्तम मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा वैश्विक मूलभूत अधिकार असे आपणास मराठीत म्हणता येईल         आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी जशी श...

कृतीतून आशा निर्माण करुया !

इमेज
जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या   होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या...

मानसोपचारावर इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक सायको थेरपीज !

इमेज
       समर्थ रामदास स्वामी यांनी " मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"  या सारख्या अभांगातून कोणत्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी मनाची निरोगी अवस्था  का आवश्यक असते हे सांगितले आहे मन हा अवयव अतिशय चंचल आहे हे ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेतून सांगितले आहेच तर अश्या चंचल मात्र कोणतेही कार्य यशस्वीतेसासाठी आवश्यक असणाऱ्या मनाला  काही आजार जडला तर त्या मनावर उपचार करणे आलेच सध्या हे मानसोपचार करणे पूर्वीच्या तुलनेत सहजसोपे आणि कमी कलंकित असले तरी हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता मानवाच्या अस्तित्वापासूनच सुरू झालेल्या या मानसिक उपचारांच्या  अघोरी म्हणता येतील अश्या कृती कार्यक्रमांना  पूर्वी मानसिक रोग्यांना सामोरे जावे लागले आहे आता मानसोपचार पद्धती मोठ्या प्रमाणत विकसित झाली असली उपचार पद्धतीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असले तरी हे मानसोपचार या पातळीपर्यंत येण्यासासाठी अनेक मानसोपचार तज्ज्ञांचे यासाठी  अथक श्रम कारणीभूत राहिले आहेत . हे श्रम काय होते ?  मानसोपचार तज्ज्ञांनी क...

माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

इमेज
               मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे  सांगत समर्थ रामदास स्वामी १७व्या शतकातच एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी निरोगी प्रसन्न मनाचे किती महत्व आहे हे सांगितले समर्थ रामदास स्वामी यांच्याच मनाचे श्लोकात देखील मन किती महत्वाचे आहे  "हे मना सांगा मना रावणा काय झाले अकस्मात राज्य ते राज्यही सर्वही बुडाले या सारख्या श्लोकातून मन खंबीर असणे किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सडांगितले आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्यानंतर २० व्या शतकात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई यांनी त्यांच्या "मन वढाय  वढाय" सारख्या कवितेतून मनाच्या चंचलतेबाबत  सांगितले आहे आपल्या दुर्दैवाने या सारख्या  मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता  आपल्या आयुष्यातील महत्वाच्या मात्र दुर्लक्षित अश्या मन या गोष्टीकडेआपण दुर्लक्षच केलेलं दिसते . मानवी वर्तनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या मन या गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगत फक्त रुग्णासाठीच नव्हे तर सर्वसामन्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,  संस्था त्यामुळे ...

अथांग मनाचा थांग घेणारे मनकल्लोळ

इमेज
    १७व्या शतकात समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्र्लोकात एखादे कार्य यशस्वी होण्यसासाठी मन करावे  प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या सारख्या  श्र्लोकाद्वारे  मनाचे  मानवी आयुष्यतील महत्व स्पष्ट केले आहेच  आहे सध्याच्या स्पर्धेच्या काळात याचे महत्व अधिकच वाढलेले आहे. त्यामुळे मन अप्रसन्न का होते ? मन अप्रसन्न झाले हे ओळ्खह्ण्याची लक्षणे कोणती ? हे सर्वांनां माहिती असणे अत्यावश्यक झाले आहे .त्यामुळे अनेक विषयावर अत्यंत सोप्या मराठी भाषेत माहितीपूर्ण लेखन करणारे अच्युत गोडबोले यांनी नीलांबरी जोशी  यांची सहलेखक म्हणून मदत घेऊन  मानसिक आजार या  संकल्पनेवर  लिहलेले मनकल्लोळ हे पुस्तक अत्यंत महत्व्वाचे ठरते.   या पुस्तकाच्या  पहिल्या भागाचे वाचन करण्याचे सौभाग्य मला सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या मदतीने मिळाले दोन भागात प्रकशित या पुस्तकाच्या पहिल्या भागात  विविध मानसोपचार पद्धती , विविध प्रकारचे मानसिक आजाराची माहिती ,आजारांवर आजार होण्यामागची कारणे ,त्यावर कोणत्या प्रकरचे उपचार करण्यात य...

केंद्र सरकारचे स्वागतार्ह्य पाऊल

इमेज
नुकताच काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यामार्फत एक अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आपल्या भारतातील वाढत्या आत्महत्या विचारत घेऊन पुढील आठ वर्षात टप्याटप्याने अमलात येणारी आत्महत्या प्रतिबंध कृती कार्यक्रम आखल्याचा तो निर्णय होता . या कृती कार्यक्रमामुळे पुढील ८ वर्षात अर्थात २०३० पर्यंत देशातील आत्महत्या १० % कमी होतील अशा विश्वास हा कार्यक्रम जाहीर करताना  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  मनसुख माडाविया  यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम देशातील प्रत्येक जिल्ह्यात एकाचवेळी विविध स्तरावर राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध उद्दिष्ट गाठण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा घालून देण्यात आली आहे देशातील आत्महत्या रोखण्यसाठीचा देशातील हा पहिलाच कृती कार्यक्रम आहे .कोणी  कितीही मोदी विरोधक असला  तरी  मात्र या कृती कार्यक्रमाबाबत केंद्र सरकारचे अभिनंदनच करेल असाच हा कार्यक्रम आहे  या कृती कार्यक्रमानुसार पुढील तीन वर्षात लोकांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी संस्थात्मक रचनेचे कार्य पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे  ...

मना सज्जना !.....

इमेज
          मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्यअत्यंत महत्त्वाच्या   घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे   १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन .  १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो            १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो २०२२ सालाची संकल्पना आहे " Make Mental Health & Well-Being...

आत्महत्या एक सामाजिक कलंक

इमेज
          जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात या कारणांचा वेध घेतला असता ,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या   होतात त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात   आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच   हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर   जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात   आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा   समाजात अत्म्हत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो   हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्...