पोस्ट्स

मार्च ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
 4 मार्च 2021 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची अधिसूचना जाहिर करण्यात आली. 24 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उत्सुक या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेस्थळावर  अर्ज करु शकतील. जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण  परीक्षा असणाऱ्या या परीक्षेतून ( पहिल्या क्रमांकावर फ्रान्सची नागरी सेवा परीक्षा )  भारतीय प्रशासनाच्या पोलादी चौकटीसाठी अधिकारी निवडले जातील. या वर्षी 712 पदांसाठी अधिकारी निवडले जाणार असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे जाहिर करण्यात आले आहे.       गेल्या काही वर्षाचा विचार करता दरवर्षी मागील वर्षापेक्षा कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात याही वर्षी कायम आहे. मागील 2020 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती. या वर्षी 712 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा होत आहे. सन 2015साली .1129,   ,2016 साली  1079, 2017साली 980  , 2018  साली 792 , 2019 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.  पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यांची भरतीसंख्या कमी होतानाच दिसते .गेल्या सहा वर्षीचा आढावा घेतल्य