पोस्ट्स

मार्च १७, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विषवदिन विशेष

21 मार्चच्या अनुषंगाने समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ पृथ्वी सुर्या भोवती फिरते  हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान .  धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .            सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत  आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण  होते  पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात  विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर . 21मार्चनंतर सूर्य कर्कवृताकडे  भ्रमण करतो सूर्य कार्कवृतावर  २२जूनला असतो