पोस्ट्स

मार्च ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तनमधील राजकारण कोणत्या वळणावर ?

इमेज
     पाकिस्तानातील राजकारण कोणत्या वळणावर ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या प्रकाराच्या बातम्या सध्या पाकिस्तानमधून येत आहेत . पाकिस्तानमधील केंद्रीय सत्तेचा विचार करता प्रमुख आणि जवळपास एकमेव म्हणावे  असे विरोधी पक्षनेते पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत तसेच खैबर ए पख्तुन्वा आणि  देशातील महत्त्वाच्या प्रांत असलेल्या पाकिस्तनी पंजाब या प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याबाबत   ज्या बातम्या येत आहेत ते बघता येत्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडणार हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे .          पाकिस्तानी संविधानुसार प्रांताच्या विधानसभा विसर्जित झाल्यावर ९० दिवसात त्या ठिकाणी निवडणुका घेणे बंधनकारक असताना  दोन्ही प्रांताच्या विधानसभा विसर्जित होऊन ४५ दिवस होता आले असतांना अजून पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडून याबाबत काहीच पाऊले उचलली जात नसल्याने निवडणुकीचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे निवडणुक आयोगाच्या निष्कियतेबाबत न्यायालायने ताशेरे ओढल्याने राजकारणात मोठी वाढ झाली आहे संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन या निवडणुकांमध्ये