पोस्ट्स

ऑक्टोबर २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धनत्रयोदशी विशेष

इमेज
बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा , असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा . आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते . धन्वंतरीकडे , दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते . काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते .   दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे   या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता . आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा , राणी त्यांचे लग्न करून देतात . लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो . या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही . तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या - चांदीच्या मोहरा ठेवते . सर्व महालात लखलखीत

पुण्यातील घटनेचे अन्वीयार्थ

इमेज
           पुण्यात बेमोसमी पावसाने रस्त्यांना नद्याचे स्वरुप आल्याचे आपण सर्वांनी बघीतले . यावर विविध माध्यमातून पुण्यात झालेल्या अनिर्बंधपणे झालेल्या नागरीकरणास जवाबदार धरण्यात आले. पुण्याप्रमाणे अन्य शहरे देखील अनिर्बंध नागरीकरणाची बळी ठरली असल्याचे यावेळी सांगण्यात आले हे सर्व घडत होते जगाला नागरीकरणाची काहीही माहिती नसताना युरोप खंडातील लोक जवळपास अर्धनग्न अवस्थेत फिरत असतांना सध्याच्या युरोप खंडातील देशांना  अमेरिका देशाला लाजवेल अश्या प्रकारचे नगर नियोजन करणाऱ्या देशात.  आजपासून किमान  साडेतीन हजार वर्षांपूर्वी  ज्या देशात सुनियोजित शहरे  होती , ज्यामध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था होती दळणवणासाठी पुरेसे रुंद आणि पक्के बांधकाम होती रस्ते होते . सार्वजनिक स्नानगृहे होती अन्न साठवायला पक्क्या विटांनी बांधलेली कोठारे होती त्या देशात साडेतीन ते चार हजार वर्षात जगाला आदर्शवत अनुकरणीय वाटेल अश्या सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणापासून जगात आपले हसे होईल अश्या बकाल शहरीकरणापर्यंत आपण केलेला प्रवास पुण्यात आपणाला त्यावेळी दिसला      सध्या अत्यंत कमी वेळेत मोठ्या प्रमाणत पा