पोस्ट्स

नोव्हेंबर १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकारणाचे अथपासून इथीपर्यत उलगडणारी कांदबरी सिंहासन

इमेज
    आपल्या मराठीला अनेक चांगल्या कादंबरीची मोठी दिर्घ परंपरा लाभलेली आहे. या या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी अनेकदा ऐतिहासिक तसेच सद्य स्थितीवर आधारीत आहे. कादंबरीवर अनेक  उत्तमोत्तम चित्रपट देखील निघाले आहेत. अस्याच कांदबरी आधारीत एक उत्कृष्ट चित्रपट जो सद्य स्थितीवर भाष्य करतो असा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित होवून ४४वर्षे पुर्ण झाली तरी आज देखील ताजातवाना वाटतो असा मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीवर आधारीत मल्टीस्टार असलेला चित्रपट सिंहासन . तर मित्रांनो हा उत्कृष्ट चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारीत आहे.त्यातील एक म्हणजे "सिंहासन" मी नुकतीच वाचली.ज्यामुळे सिंहासन  या अजरामर ठरेल अस्या या चित्रपटाची कथा तितकीच सशक्त आहे, हे मला समजले. ज्या प्रमाणे चित्रपट सुरवातीपासून आपली पकड घेतो त्या प्रमाणेच कांदबरी देखील आपल्या मनाचा लगेच ठाव घेते.कांदबरीत पार्श्वभूमीवर फारसी पाने ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी खर्ची पाडलेली नाही. सुरवातीच्या जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या पानांमध्येच त्यांनी कांदबरीसाठी पार्श्वभूमी उभारली आहे.       चित्रपटाप्