पोस्ट्स

नोव्हेंबर १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

येता पंधरवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा

इमेज
        नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे . पाकिस्तानमधील राजकीय संकट कोणते वळण घेते आणि राजकीय संकटामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती कशी होते ? हे या पंधरा दिवसात पूर्णतः नाही मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणत स्पष्ट होईल . पाकिस्तानमधील सत्तेच्या वर्तुळात एस्टाब्लिमेन्ट असा उल्लेख होत असलेला घटक अर्थत पाकिस्तानच्या लष्कराच्या  प्रमुखपदी सध्या असणाऱ्या जनरल करीम वाजवा यांची मुदत २८ नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यांच्या जागी कोणाची नेमणूक कार्याची ? याबाबत घडणाऱ्या राजकारणाने सध्या सर्वोच्च पातळी गाठली आहे विद्यमान पंतप्रधानां शाहबाझ शरीफ यांची पुतणी आणि आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ हिने लष्करातील एका  भावी ज्येष्ठ उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे उघड उघड नाव घेतल्याने हे नाट्य काहीसे  चिघळले आहे पाकिस्तानी लष्करातील ५ ज्येष्ठ अधिकाऱ्यांपॆकीच एक लष्करप्रमुख होणार असला तरी त्यापैकी एका अधिकाऱ्याचे नाव मरियम यांनी घेयला नको  होते  असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे या मुळे विद्यमान सरकारकडून पात्रतेला डालवून स्वतःच्या मर्जीतील व्यक्