पोस्ट्स

जून ११, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक्सिट एक अवलोकन भाग २

इमेज
                                          ब्रेक्सिट विषयावरील हा दुसरा लेख . पहिल्या भागात आपण ब्रेक्सिट या विषयाची पार्श्वभुमी आणि इतिहास बघितला . आज आपण त्याची सध्याची स्थिती बघणार आहोत . ज्यांना या विषयावरील माझा पहिला लेख वाचायचा असेल ते या दुसऱ्या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकचा वापर करून माझ्या पहिल्या लेखावर जाऊ शकतात . माझा या विषयावरील पहिला लेख १४ फेब्रुवारीला लिहला होता . त्यानंतर आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल आहे .                                   आजमितीस युनाटेड किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी  ब्रेक्सिट विषयावर संसदेमध्ये मिळालेल्या अपयशाची जवावाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे . सध्या त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे . ब्रेक्सिट या विषयावर संसदेत अपयशी ठरलेल्या मे या दुसऱ्या पंतप्रधान .  त्यांचा आधी त्यांचाच पक्षाच्या डेव्हिड कॅमरेरून यांनी ब्रेक्सिट याच विषयावर संसदेत मतैक्य ना करता आल्याने राजीनामा दिला होता . त्या  मुळे जगाला आधुनिक प्रकारची  लोकशाही देणारा देश प्रचंड राजकीय संकटात सापडला आहे . एका राजकीय पक्षाने स्वतःची सत्ता यावी ,म्हणू