अस्थिरतेच्या वळणावर पाकिस्तान!
सध्या आपल्या भारतात कोरोनामुळे थैमान घातले गेलेले असताना, आपल्या शेजारच्या पाकिस्तानात एका विषारी वृक्षाला विषारी फळे आली आहेत. पाकिस्तानात कट्टर धार्मिक लोकांनी तिथे प्रचंड दंगली घडवल्या आहेत. पोलीस प्रशासनातील लोकांना बंदीस्त करण्यापर्यत या दंगलखोरांची त्यांची मजल गेली आहे. मुळात धार्मिक बहुसंख्यतेचे कारण देत निर्माण झालेल्या या देशात कायमच राजकीय अशांतता राहिली, ज्याचा परीपाक धार्मिक कट्टरता होण्यास वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होण्यात झाली. त्यातही 25 जूलै 1977 ते 11 आँगस्ट 1988 पर्यत पाकिस्तानात असणाऱ्या जनरल झीया उल झक् सारख्या कट्टर धार्मिक प्रवृत्तीच्या हुकुमशाहाच्या कार्यकाळात तीला खतपाणीच मिळाले. पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरतेचा अभ्यास करताना जिया उल झक यांच्या कार्यकाळापूर्वीची पुर्वीची कट्टरता, जिया उल झक् यांच्या कार्यकाळातील कट्टरता , आणि त्यांचा अनपेक्षीत झालेल्या मृत्यूनंतरच्या (त्याचा मृत्यू, हा अपघात की खून याबाबत विविध दावे केली जातात असो) काळातील कट्टरता असे टप्पे निर्माण करावेच लागतील. जि...