पोस्ट्स

जुलै २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठयावर

इमेज
        आपल्याकडे अनेक नाट्यमय वाटाव्या अश्या राजकीय घडामोडी घडत असताना जगात देखील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत होत्या ज्यामुळे जग तिसऱ्या  महायुद्धाच्या  उंबरठयावर तर नाहीना ?  अशी भीती उत्पन्न झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर १९९० पर्यंत सुरु असलेल्या शीतयुद्धाचा दुसरा अंक सुरु झाल्याचे गेल्या काही दिवसातील घडामोडी बघून लक्षात येते  शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेचा फक्त एकच शत्रू होता युनाटेड सेव्हिंयत सोशालिस्ट रशिया , या शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकात मात्र अमिरिकेचा रशिया बरोबर अजून एक शत्रूं असणार आहे तो म्हणजे चीन . २९ जून आणि ३० जून रोजी स्पेन या देशाची राजधानी असलेल्या मॅड्रिड शहारत  झालेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशन अर्थात नाटो या नावाने सुपरिचित असलेल्या लष्करी गटाची झालेल्या  बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नाटो आता रशिया बरोबर चीन विरोधात देखील आघाडी उभारणार आहे हिंद प्रशांत क्षेत्रात रशिया आणि चीन करत असलेल्या आर्थिक आणि लष्करी दडपशाहीमुळे नाटोला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले  नाटोने युरोपातील सैनिकांची संख्या तीन लाखांपर