पोस्ट्स

जानेवारी १९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगाचे वर्तमान मोठ्या प्रमाणात बदलवणाऱ्या घटनेचा सविस्तर वृत्तान्त "शोध दहशतवादाचा "

इमेज
सप्टेंबर 11सन 2001 ही फक्त अन्य तारखेसारखी तारीख नाही.वर्तमानात आपण ज्या समस्या अनुभवतोय.त्यातील अनेक घटनांचा मार्ग बदलण्याची घटना या तारखेस झाली. न्युर्याक येथील ट्वीन टॉवरवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची घटना म्हणून आता या प्रसंगाला आपण ओळखतो‌.या प्रसंगावर आतापर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिहून झाले आहे. मात्र ते सारे इंग्रजीत लिहलेले आढळते.काही प्रमाणात अन्य भारतीय भाषेत या बाबत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आढळते. मात्र या लेखनाच्या मुळाशी गेल्यास मुळातील इंग्रजी लेखनाचा तो अनुवादच असल्याचे आपणास दिसते‌. या घटनेविषयी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या वृत्तपत्रातील बातम्या,अमेरीकन प्रशासनाचा याबाबतचा अहवाल यांचा अभ्यास करत थेट इंग्रजी सोडून अन्य भारतीय भाषेत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आपणास सहजतेने दिसून येत नाही. आपल्या मराठीमध्ये मात्र ही उणीव भरून निघाली.आणि याला निमित्त ठरले आहे अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले "शोध दहशतवादाचा" हे पुस्तक .शोध दहशतवादाचा या पुस्तकाचे लेखन केले आहे, ज्येष्ठ पत्रकार के. पुरुषोत्तम महाले यांनी .     महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्तस