वंगळ भाशा कंची ?

काल मिञांच्या बरोबर कटट्यावर बसलेलो असताना एक मिञ सहजच ग्रामीण भाषेत बोलू लागला शुध्द भाषेत बोलत आहेस ? आणी हे बघून आमच्यातील एक जणाने त्यास म्हटले काय अशुध्द भाषेत बोलत आहेस आतापर्यतचे समस्त जीवन शहरात घालवणार्या या माझ्या मिञाने ग्रामीण भाषेला सरळ सरळ अशुध्द ठरवले होते , माञ दुर्दैवाने हे ठरवताना तो हे विसरला की इंग्लीश भाषेत सुध्दा (माझ्या मते इंग्लीश हे विशेष नाम आहे सबब त्याचे इंग्रजी असे भाषांतर करणे गैर आहे )पण अमेरीकन इंग्लीश आणी ब्रिटिश इंग्लीश असे दोन मुख्य (आणी कित्येक उप प्रकार ) प्रकार आहेत हे दोन प्रकार निमुटपणे मान्य केले जातात त्यात शुध्द आणी अशुध्द असे वर्गीकरण केले जात नाही मग मराठीतच असे वर्गीकरण का केले जाते ? ग्रामीण मराठीला अशुध्द म्हणून हिणवणार्या कडे बहूथा या प्रश्नांचे उत्तर नसते ते व्याकरणाचा आधार घेउन आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात माञ माझ्या मते व्याकरण वाक्यरचना कशी असावी ते शिकवते त्यात कोणते शब्द असावेत हे शिकवत नाही मराठीत कर्तरी प्रयोगाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास कर्ता +कर्म +क्रियापद अशी रचना करण्याचे व्याकरण सांगते खुप या शब्दा ऐवजी लई शब्द असावा कि नसावा या बाबत व्याकरण काही सांगत नाही तुम्हाला काय वाटते व्याकरण भाषेच्या बाबतीत कोणती भुमिका पार पाडते मी शब्दा बाबत बोलत आहे र्हस्व (पहिला ऊकार किंवा पहिली वेलांटी )व दिर्घ ( दुसरा ऊकार किंवा दुसरी वेलांटी )या बाबतीतील चुका या चुकाच आहेत असे मला वाटते तुम्हाला काय वाटते ? ठराविक ठिकाणी किंवा ठराविक समुहा कडून बोलली 
जाणारी भाषाच काय ती शुध्द बाकीचा अशुध्द हे ठरवण्याचा निकष तो काय ? आणी या निकषांमध्ये बसणार्या भाषेमध्ये अन्य भाषिक शब्द वापरले तरी ती भाषा शुध्द आणी हे निकष न पाळणार्या माञ सर्व शब्द मराठीत असणारी ग्रामीण मराठी माञ अशुध्द हे कसे काय ? जाणकरांनी क्रुपया मार्गदर्शन करावे भाषा हे संपर्काचे माध्यम आहे ज्या भाषेत बोललेले समोरच्याला समजते ती भाषा योग्य असे जरी मानले तरी ही शुध्द अशुध्द ची भिंत जी शहरी प्रमाण भाषा( हा पण एक चर्चेचा विषय होइल पण सध्या तो विषयावर मी भाष्य करू इच्छीत नाही असो )आणी ग्रामीण भाषा यातील फरकावर आधारीत आहे आणी ते अयोग्य आहे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते ? अशी दरी भाषेत निव्वळ भाषेत वापरल्या जाणार्या शब्दावरुन करणे कितपत योग्य आहे माझ्या मते निव्वळ शब्दावरुन भाषेचे शुध्द अशूध्द स्वरूप ठरवणे अयोग्य आहे (मी या ठिकाणी मराठीत असणारे शब्द विचारात घेतले आहे विनाकारण अन्य भाषेतील शब्द वापरल्यास माझ्या मते ती अशुध्द भाषाच आहे ) तुमचे या विषयी मत काय ? तुमचा मते भाषा शुध्दतेचे आणी अशुध्दतेचे निकष काय ? कश्याला अशुध्द भाषा म्हणायचे ? तसे या वर खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?