छञपती शिवाजी महाराज ,स्वातंञ्यवीर सावरकर आणि आजची मराठी

छञपती शिवाजी महाराज आणि स्वातंञ्यवीर सावरकर हे दोघे महाराष्ट्राचे आराध्यदैवत . दोघांनी सामान्य माणसांचा विचार केला .छञपती शिवाजी महाराज आणि स्वातंञ्यवीर सावरकर यांचा कालखंड जरी भिन्न असला तरी अनेक बाबतीत त्यांचे विचार समानच असल्याचे आपणास जाणवते .
दोघांकडे भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती . 
छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे .असे इंग्रजांबाबत मत व्यक्त केले होते आणि या पुढील काळात हल्ले समुद्रामार्गे होतील तिही सिध्दता आपण करायला पाहिजे असेही मत व्यक्त केले होते .इंग्रजांनी केलेले नुकसान सर्वश्रुत आहेच . अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे . 
लष्करीकरणाविषयी आणि चिनविषयक स्वातंञ्यवीर सावरकरांची मते आज आपण प्रत्यक्षात उतरतांना बघतो आहोतच.
या दोघाचे अजून एक समान कार्य म्हणजे त्यानी मराठी भाषेविषयी केलेले कार्य 
छञपती शिवाजी महाराजांच्या काळात तत्कालीन मराठीत अनेक फारशी शब्दांचा वापर होत होता (सध्या फारशीची जागा इंग्रजी घेतीये ) छञपती शिवाजी महाराजांनी त्या फारशी शब्दांना अनेक मराठी प्रतीशब्द दिले .त्यासाठी त्यांनी राजभाषाकोष तयार केला होता . त्यांनी मराठी ही राज्यकारभाराची भाषा केली होती . मराठीचा विकास करण्यासाठी छञपती शिवाजी महाराजांनी अनेक कार्ये केली 
स्वातंञ्यवीर सावरकरांनी देखील अनेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतीशब्द दिले . जसे Editer ला संपादक वगैरे . त्यांनी भाषेकडे लक्ष देण्याची गरज वारंवार बोलून दाखवली . त्यासाठी शक्य तेव्हढे प्रयत्न देखील केले .
आज माञ मराठीची अवस्था फारशी उत्तम नाही हे आपण जाणताच . अनेक इंग्रजी शब्दांमुळे मुळचे मराठी शब्द माझ्या वैयक्तीक संपर्कातील अनेक जण विसरले आहेत . माझा पुर्णपणे मराठीतच बोलले पाहिजे (उदाहरणार्थ मराठीतील गाजलेली अशी झी मराठी वरील रमाबाई रानाडे यांच्या मालिकेत वापरलेली किंवा त्या प्रकारच्या मालीकेत वापरली जाणारी भाषा ) अशा मुळीच आग्रह नाही , माञ कारण नसताना अन्य भाषिक शब्द वापरु नयेत . असे करण्यास काय हरकत आहे . मला याची पुर्ण जाणीव आहे की रूढ झालेल्या अनेक इंग्रजी शब्दांना बोलण्यास ञासदायक वाटावे अशे मराठी शब्द आहेत . त्यांची क्लिष्टता तज्ञांनी दूर करावी अशी मी त्यांना विनंती करतो .
काही जण असेही म्हणतील की भाषा ही प्रवाही असते . त्यात इतर भाषेतील शब्द आल्याने भाषेचा मधुरतेत वाढच होते . इंग्रजीत अनेक भारतीय भाषेतील शब्द आले की नाही , त्यामुळे कोणता ब्रिटीश व्यक्ती इंग्रजी बिघडली असे म्हणतोय . मला त्यांना एव्हढेच सांगाचेय की इतर भाषेतील शब्द जरूर वापरावेत माञ या शब्दांचे वापरातील प्रमाण विचारत घेयला हवे . ते इतकेही नको की त्यामुळे मुळ भाषेचा डौल बिघडेल 
भाषा हा मुद्दा महत्वाचा आहेच . पाकिस्तानपासून बांगलादेश फुटण्यासाठी जे मुद्दे होते त्यात भाषा पण हा एक मुद्दा होता . सध्याही पाकिस्तानत असणार्या कोणत्याही राज्याची भाषा नसणारी उर्दु ही त्यांची राज्यभाषा आहे ( सिंधची सिंधी ,पंजाबची पंजाबी बलूचीस्थानची बलूची ,खैबर ए पश्तूनीस्थानची पश्तूनी , ) आपल्या भारतात असणार्या 29 राज्यांपैकी 8 म्हणजे 1/3पेक्षा अधिक राज्यांची भाषा हिंदी आहे . जिला आपण महत्वाची संपर्क भाषा मानतो तसे यावर खुप काही बोलता येवू शकते माञ कवीवर्य कुसुमाग्रजांच्या स्वातंञ्यदेवतेची विनवणी या कवितेतील
ओळी सांगून सध्यापुर्त थांबतो 
भाषा मरता संस्कृती मरते हे ध्यानी धरा 
मायमराठी मरते इकडे पडकीचे पद चेपु नका 
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?