शनी शिंगणापूर येथील वाद आणि स्वातंञ्यवीर सावरकर

भारताच्या महान क्रांतीकारकांमध्ये समावेश होणार्या स्वातंञ्यवीर सावरकर यांच्या प्रयोवशनाला ( पुण्यतिथी दिन ) यंदा 2016 साली 50 वर्षे पुर्ण होत आहे . त्या निमित्याने त्यांचा विचाराचा आढावा घेत असताना मला लक्षात आले की समाजाला संपुर्ण स्वातंञ्यवीर सावरकर समजलेच नाहीस. त्यांनी मांडलेल्या विज्ञाननिष्ठ समाजरचनेला तसेच त्यांनी अंदमानातून सुटका झाल्यावर रत्नागिरी येथे केलेल्या समाजसुधारणेबाबत मला तरी फारशे लिहलेले दिसत नाही (माझे वाचन परीपुर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही . किंबहूना मी एक वेडा मनुष्य आहे असे समजणेच योग्य ठरेल ) स्वातंञ्यवीर सावरकर धर्मप्रेमी जरुर होते . माञ त्यांची श्रध्दा चिकित्सेवर आधारीत सश्रध्दा होती . प्रसंगी त्यांनी गाईच्या उपयक्तेवर देखील भाष्य केले . त्यांनी जातीजातीत पडलेले अंतर कमी करण्यासाठी रत्नागिरीत पतीतपावन मंदिर उभारले . माझा मते स्वातंञ्यवीर सावरकरांचे हिंदुत्व विज्ञानाधारीत होते . नकी पोथीनिष्ठ . माञ आज मला तरी याचा विसर पडला असे वाटते( हे माझे मत आहे . ज्याप्रमाणे हाताची पाची बोटे समान नसतात त्या प्रमाणे तुमचे मत भिन्न असू शकते याची मला पुर्ण जाणीव आहे . आणि मी त्याचे स्वागतच करतो )   
शनी शिंगणापुर येथील घटनेवर ज्या प्रकारे विविध समाजमाध्यमे (Social media ) आणि ईतर पारंपारीक माध्यमांमध्ये( जसे वृतपञे वृतवाहिन्या नभोवाणी /रेडीओ ) प्रकारे वार्तांकन झाले . त्यावरुन ही गोष्ट स्पष्ट होते . लोकांनी विज्ञानिकदृष्टा या श्रध्देचा विचार करण्याचा ऐवजी भावनेला अधिक महत्व दिले जे स्वातंञ्यवीर सावरकरांच्या चिकित्सक भुमिकेला सश्रध्द( सश्रध्देला डोळस श्रध्दा देखील म्हणतात ) छेद देणारे होते . स्वातंञ्यवीर सावरकरांनी कायम विज्ञानालाच महत्व दिले ते त्यांचा मृत्युपञातून स्पष्ट होते (त्यांचा मृत्युपञातील किती गोष्टी वास्तवात आल्या ही गोष्ट नविन वादाला तोंड फोडेल त्यांमुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ) या गोष्टीला काही जणांनी वैज्ञानिक आधार पण देण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा माझा मनाला पटला नाही .( मी व्यक्ती स्वातंञ्य मानतो सबब तुम्हाला तो पटु शकतो हे मला मान्य आहे ) 
स्वातंञ्यवीर सावरकरांनी दुभंगलेला समाज एकञ येण्यासाठी त्यांच्या अंदमानातून सुटकेनंतर रत्नागिरीत (माझी का ते मलाच माहित नाही पण स्वातंञ्यवीर सावरकरांशी संबधीत असणार्या नाशिक ते रत्नागिरी या दरम्यान स्वातंञ्यवीर सावरकर एक्सप्रेस ही रेल्वे सूरु होण्याची इच्छा आहे ) पतीतपावन मंदिर उभारले माञ आजकाल समाजात ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी करावयाची उपाययोजनेसारखी एखादी सुधारणा करून आणायची असल्यास देखील आमच्यावरच का बंधने त्यांच्यावर का नाही ?असे मुद्दे उपस्थित करुन किंवा अन्य काहि मुद्मांसाठी समाजात फुट पाडली जातेय जे सर्वथा अयोग्य आहे असे माझे प्रामाणीक मत आहे . जे मला शनी शिंगणापुर येथील घटनेत सुध्दा आढळले . ( माझे निरीक्षण परीपुर्ण आहे असा माझा दावा नाही किंबहूना ते पुर्णत: चुकिचे आहे असेच समजणे योग्य ठरेल ) 
या विषयी खुप काही बोलता येवू शकते . माञ मी हे ज्या समाज माध्यामातून बोलत आहे त्याचा मर्यादा लक्षात घेवून थांबतो 
आपला अजिंक्य तरटे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?