मराठी पाउल पडते कुठे ?

कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग
त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता .
कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रजी  . आपल्या मराठीत एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे . याचा अर्थ थोड थोड करतं गेल्यास खुप मोठ्या प्रमाणात वस्तू साठतात . तोच न्याय  या बाबतीत वापरायचा झाल्यास आज मी वापरु इच्छिणारे एक एटिम मराठीसाठी  बंद उद्या दुसरे परवा तिसरे एटिम बंद असे करत एक दिवस सर्व एटिम मधून मराठी रामराम म्हणेल का ? असा प्रश्न निर्माण होतो . तसे झाल्यास मराठी भाषा  उद्योग विश्वातून जय महाराष्ट्रच म्हणण्याचा धोका निर्माण होवू शकतो असे मला वाटते (अर्थात मी सर्वज्ञ नाही माझ्या ज्ञानात अनेक कमतरता आहेत याची मला जाणीव आहे इतर व्यक्ती सर्वज्ञ असू शकते याची पण मला जाणीव आहे) आपणास काय वाटते . कविवर्य कुसुमाग्रजांच्या फटका या काव्यप्रकरातील स्वातंञदेवतेची विनवणी या कवितेत "भाषा मरता संस्कृतीही मरते हे ध्यानी धरा" असे एक वाक्य आहे  याचा मी वर जे बोललो याचाशी संबध जोडल्यास फारशे चांगले चिञ निर्माण होत नाही , असो  हे चिञ सहज बदलता येवू शकते .जनरेट्याची ताकद फार मोठी असते हे आपण जेसिका लाल हत्याकांडात बघितले आहेच .न्यायालयाने निर्दोष सोडलेले आरोपी आज तुरुंगात आहेत ते फक्त जनरेट्यामुळेच ना ? आणी प्रत्येक गोष्टीसाठी मोठा जमावच आला पाहिजे असे नाही . प्रत्येकाने वैयक्तीकरीत्या सुरवात जरी केली तरी थेंबे थेंबे तळे साचे याचा परिणाम होत चांगला परिणाम होवू शकतोच . मी एकदा युट्यूब एक व्हिडीओ बघीतला होतो तुम चलो तो हिंदुस्थान चले या टँग लाईनचा त्यात रस्त्यात मधोमध झाड पडलेले असते त्यामुळे वाहतूक कोंडी पण झालेली असते पाउस पडत असल्याने ते झाड कोणीच दूर करायला तयार होत नसतो जो तो दूसर्याकडे बोट दाखवत असतो इतक्यात  एक बारीकसा पोरगा येवून ते दुर करण्याचा प्रयत्न करतो ते बघून ईतर ही लोक त्याला मदत करतात . आपण मराठीबाबत ते पोरग होण्याचा का म्हणून प्रयत्न का करु नये .
स्वामी विवेकानंदांचा एक विचार आहे ." कोणत्याही कार्याला प्रथमत: विरोध संघर्ष नंतर स्विकार या मार्गाने जावेच लागते " याच विचाराचा अनुषंगाने सुरवातीला ञास होणार हे नक्की माञ नंतर आनंद हाही ठरलेलाच आहे ना
आपला अजिंक्य तरटे
जाताजाता . :सोमवार दिनांक 8फेब्रुवारीच्या सायंकाळापासून ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशीत केलेले "गुरुदत्त एक तीन अंकी शोकांतिका " हे पुस्तक वाचायला सूरवात केलीये सबब माझी मी स्वत: लिहलेली (फॉरवड केलेली नाही )पुढची पोस्ट त्या पुस्तकाचा अनुषंगाने असेल याची नोंद घ्यावी
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?