चांगले जल चांगली नोकरी

मार्च महिना सुरु झाल्यावर ज्या अनेक गोष्टीची आठवण होते . त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे २२ मार्चचा जागतिक पाणी दिवस . 1992 मध्ये पाणी प्रश्नावर  आयोजित केलेल्या युनो च्या परिषदेत ठरल्या प्रमाणे 1993  पासून 22 मार्च जागतिक पाणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . पृथ्वीवर 71 % असणाऱ्या पाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे  मानवाचे दुर्लक्ष होते परिणामी त्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होते . जरी पृथ्वीवर 71% पाणी असले तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे . बहुतांशी पाणी समुद्रात आहे जे पिण्यायोग्य नाही त्यात अनेक क्षार मिसळेले आहेत. पिण्यायोग्य असणाऱ्या पाण्यातील बहुतांशी पाणी दोन्ही ध्रुव आणि हिमालय आदि पर्वतात गोठलेले आहे . जागतिक हवामानाचा विचार करता ते पाणी वापरणे फारशे योग्य नाही . परिणामी उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम 3 ते ४ टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येते . आणि मानव पाणी  फारच गैर प्रकारे वापरतो . ते असेच चालू राहिले तर भविष्यात मानवास पाणी वापरण्यास
राहणारच नाही . या कडे लक्ष वेध घेण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते .आपल्या भारतीय तत्वज्ञानात पाण्याला पंच महाभूताची उपमा दिली आहेच . या पंचमहाभुतांचा आपल्यावर प्रकोप वक्रदृष्टी पडू नये म्हणून अनेक सृक्ते वेदांमध्ये आहेत . त्याचेच आधुनिक एकविसाव्या शतकातील स्वरुप म्हणजे हा दिवस .पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळून सध्याचा विज्ञानाला ज्ञात असलेली एकमेव प्रगत सृष्टी नष्ट न होण्यासाठी  केलेला प्रयत्न म्हणजे 22 मार्च रोजी साजरा होणारा जागतिक पाणी दिवस . जर पाणी प्रदुषित झाले तर मानवच किंवा जलचरच नव्हे तर समस्त प्राणी सृष्टी धोक्यात येवू शकते . आधूनिक युध्दशास्ञात  नदी अथवा तलावात घातक विषारी रसायने सोडून लोकांचे प्राण घेण्याची संकल्पना मांडली गेलीच आहे
मानवी जिवनाचा प्रारंभ हा पाणवढ्याजवळ झाला . मानवी शरीरात देखील पाण्याचे महत्व प्रचंड आहे . त्याचे संवर्धन करणे हा या मागचा हेतू आहे .
   दर वर्षी एका संकल्पनेवर आधारित कार्यक्रम अयोजीत करून हा दिवस साजरा करण्यात येतो . 2016 सालची संकल्पना आहे चांगले जल चांगली नोकरी ( Better Water Better Job ) जर चांगले पिण्यायोग्य  पाणी असेल तरचं आरोग्य चांगले राहील  चांगल्या आरोग्यापायी  नोकरित चांगली कार्यक्षमता दाखवता येईल . अंतिमत: नोकरीत बढत्या मिळून चांगली नोकरी मिळेल अशी चालू वर्षाची संकल्पना आहे  .  चांगल्या पाण्याचा संबध यंदा मानवी उत्कृषाशी जोडला गेलाय . जो अत्यंत योग्य आहे . बहूसंख्य विषाणूजन्य विकार उदा कावीळ ,कॉलरा , अतीसार , य्ंचा प्रसार पाण्यामार्फतच होतो .  त्यामुळे मानवास चांगले पाणी मिळणे आवश्यक आहे .
आज जगातील असंख्य विकसीनशील आणि अविकसीत देशातील लोक दुषित पाणी पितात . औद्योगिकक्षेञातून तयार झालेल्या सांडपाण्याची योग्य ती वाट न लावल्याने हे पाणी प्रदुषीत होते
आपल्या महाराष्ट्रात देखील नाशिकची गोदावरी , वालघडी नदी   ( वाघाडी नाला ) नंदिनी नंदी ( नासर्डी नाला )पुण्याची मुळा मुठा या नद्या औद्योगिक रसायनानाने प्रदुषीत आहे . महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे खोरे असणारी आणि भारतातील महाराष्ट्र तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्याबरोबर पॉडेचरी या केंद्रशासीत प्रदेशातील यानंम या प्रदेशाची तहान भागवणारी गोदावरी नदी   उगमापासूनच्या 7व्या किलोमीटरपासून धार्मिक विधीमुळे आणि 25व्या किलोमीटरवर  असणार्या ओद्योगिक क्षेञातील रसायनांमुळे नदी प्रदुषित होण्रास सुरवात होते . यातील धार्मिक श्रध्देचा विषय बाजूला काढला तरी औद्योगिक प्रदुषणाचा मुद्दा राहतोच आणि हा मुद्दा स्थानिक महानगरपालिका प्रशासन आणि एम आय डी सी यातील हेवेद्याव्यामुळे तयार झाला आहे . नाशिकचे हे उदाहरण निव्वळ प्रातनिधीक आहे समस्त भारतातील नद्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत .त्या दूरूस्त करण्याची नितांत गरज आहे
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?