मी आणि माझे वाचन ऑगस्ट १३, २०१८

मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय .
पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली . मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?