माते नर्मदे

नूकतेच मी ' दत्तप्रसाद दाभोळकर' लिखीत " माते नर्मदे "हे पुस्तक वाचले .पुस्तक सुप्रसिध्द
"सरदार सरोवर " या विषयावर आधारीत असून पुस्तक सरदार सरोवराच्या बाजूने मतप्रदर्शन करते . जे मेधा पाटकर अमिर खान यांच्यख आंदोलनामुळेतयार झालेल्या  आपल्या पारंपारिक संकल्पनेला पुर्णपणे छेद देणारे आहे .  पुस्तकात अनेक आर्थिक संकल्पना , पर्यावरणीय संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या असल्या तरी पुस्तकाची भाषा सहज सोपी वापरल्याने पुस्तक कंटाळवाणे न बनता रंजक झाले आहे . जे वाचताना सहजतेने ठाव घेते .
पुस्तकाचा पाया ,हे धरण होणे पाश्च्यातांच्या आर्थिक साम्राजवादाचा पाया हलवणारे असल्याने ते पर्यावरणाचा बागुलबुवा उभा करत असून या संस्थांना परदेशी संस्थेकडून वित्तसाह्य होते हा आहे .जगात या पेक्षा मोठी धरणे झाली असून पाश्चात्य राष्ट्रात अनेक प्रकारे पर्यावरणाची हानी होते . माञ ती राष्ट्रे भारताला त्याच घटकाचा आधार घेत प्रगती करण्यापासून रोखतात .हा आहे .
पुर्वी उभारलेले मोठे प्रकल्प हे खोरे निहाय अभ्यास करुन उभारलेले नसल्याने फारसे उपयोगी पडलेले नाहीत . नर्मदा नदीत सरदार सरोवरा अंतर्गत उभारली जाणारी धरणे खोरे निहाय बांधली  जात असल्याने  ती उपयोगी पडणार आहेत. या प्रकल्पाचे  नियोजन अगदी काटेकोर झाले असून  या प्रकल्पा अंतर्गत येणार्या राज्यांमध्मे या बाबतचे उत्तरदायत्व ठरवण्यात आले आहे  त्याची अमंलबजावणी झाल्यास कोणतेच प्रश्न निर्माण होणार नाही . भारताला विकसीत राष्ट्र बनायचे असल्यास असे प्रकल्प अत्यावशक आहेत . दरदोई विजेचा खप , पाण्याचा वापर अश्या अनेक बाबतीत भारत जागतिक निकषाबाबत बराच मागे आहे . पाश्चात्य राष्ट्रांच्या रांगेत बसण्यासाठी असे प्रकल्प अत्यावशक असल्याचे यात सांगितले आहे .
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात . अनेकदा चंद्राप्रमाणे एकच बाजू आपल्या समोर येते . माञ दूसरी बाजू पण असतेचस. तशीच नर्मदा सरोवराबाबत ही

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Ok. Topic seems interesting. I will manage to read the book.
And the other side of the topic should also be known.

Madhura Tarte.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?