महाराष्ट्रत्तेर एस टी एक समस्या

नुकतीच  मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला रात्री भेट दिली . तेथील दृश्य बघून  मी थबकलोच,  आपण महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये असल्यासारखा भास व्हावा असे ते दृश्य होते .  महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील शहर असूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटकच्या बसेसची संख्या जास्त होती . मागे मी हा प्रकार कोल्हापूर बसस्थानकावर बघितला होता .मात्र  कोल्हापूर कर्नाटक  सीमेपासून निव्वळ २५ किमी असल्याने मी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता . त्यानंतर याविषयीची अधिक माहिती मिळावी म्हणून कर्नाटक राज्य परिवहनाच्या  संकेतस्थळावर भेट दिली असता तेथील माहिती झोप उडवणारी होती. कर्नाटक सरकार राज्याबाहेर दुसऱ्या राज्यातील ४० मार्गावर सेवा पुरवते या ४० पैकी २९ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत .  मागे मी एकदा कराडला गेलो असता मी बेळगाव ते नीरा या मार्गावरील कर्नाटक परिवहन महामंडळाची बस बघितली होती . मित्रानो नीरा हे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत असणारे गाव आहे . म्हणजेच तुम्ही समजू शकता कर्नाटक किती आतापर्यंत पोहोचले आहे . नाशिकहून बेळगावला कर्नाटक परिवहन महामंडळाच्या २ बसेस आहेत . म्हणजेच मार्ग एका बस दोन
             कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या या धक्क्यानंतर इतर राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची सेवा देतात याचा मी धांडोळा घेतल्यावर स्पष्ट होणारे चित्र फारशे उच्छाहवर्धक नसल्याचे मला दिसून आले
सर्वप्रथम गुजरातचा विचार करू . गुजरात परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या नाशिक शिर्डी या मार्गावर चालणाऱ्या बसेसची दिवसभरातील संख्या मी मोजली असत ती ३८ असल्याचे मला दिसून आले आहे . दिवसभरात २४ तास असतात म्हणजेच दर तासाला एका पेक्षा जास्त बसेस नाशिक शिर्डी दरम्यान चालवल्या जातात . नाशिकच्या बसस्थानकावर  मी अनेकदा गुजरात परिवहनाची सुरत उस्मानाबाद बस बघितली आहे . माझ्या भौगोलिक ज्ञानानुसार उस्मानाबाद हे महाराष्ट्राच्या एका टोकावरचे शहर आहे तर सुरत दुसऱ्या टोकावरच्या भागाला जवळ असणारे अन्य राज्यातील शहर आहे . गुजरातच्या बसेस महाराष्टात येण्याचे ३ मार्ग प्रामुख्याने आहेत सुरत धुळे रस्ता,   नाशिक मार्गे येणाऱ्या बसेस आणि राष्ट्रीय महामार्ग ८ मार्गे येणाऱ्या बसेस यापैकी धुळे मार्गे येणाऱ्या बसेस ची माहिती मी gsrtc च्या स्वनकेतस्थळावर घेत असताना मला समजली कि सुरत हुन अकोला या शहरात एकबस जाते . आता सुरत आणि अकोल्याच्या संबंध काय ते मला अजून समजेल नाही .
 
                            तेलंगणा आणि गोवा या राज्याबाबत विचार करायचा झाल्यास व्यवसाय कसा करावा याचा वस्तुपाठच त्यांनी पुण्यात घालून दिला आहे . पुणे परिसरातील वल्लभनगर या बस स्थानकातून या बसेस सुटतात आणि त्या दुसऱ्या थांबा घेतात तो पुण्यातल्या पुणे रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानकाच्या . यानंतर तेलंगणाची बस  सोलापूररोड  मार्गे मार्गस्थ होते . मात्र गोव्याच्या परिवहन महामंडळाच्या बसेस  यावरही कडी  करत आपल्या बसेस पुणे परिसरातील तिसऱ्या   बस स्थानकावर अर्थात स्वारगेटवर बस थांबवतात .
  एकवेळ आपण खाजगी बस चालकांना एसटी बस स्थानकाच्या बाहेर ५०० मीटरवर नेऊ शकतो . मात्र अन्य राज्यांच्या परिवहन महा मंडळाच्या बसेस या आपल्या मालकीच्या जागेत आपल्या  बसेसच्या शेजारी स्वतःची बस उभी करून महाराष्ट्रात आपला व्यवसाय करतात . त्यांनी महाराष्ट्र एसटीला घरातच स्पर्धक निर्माण केला आहे . त्यामुळे म्हणावेसे वाटते महाराष्ट्रत्तेर  राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे करायचे काय ?
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?