माझे पहिले भाषणाची हकीगत

             आपल्याकडे ६४ कला आहेत असे म्हंटले जाते . वक्त्तृवकला ही त्यापैकीच एक . नुकताच मी त्या प्रांतात प्रवेशकर्ता झालो . अर्थात  हे घडले ते अपघातानेच मी काही या क्षेत्रात प्रवेश करायचे काही ठरवले नव्हते . तसे मी बरे लिहायचो ( म्हणजे अजूनही लिहितो बरका ) त्यामुळे काही लोकांसी ओळखीही झाल्या आहेत . अशीच एक ओळख झाली एका व्याख्यान आयोजनकर्त्याशी . माझे लेखन बघून त्यांना काय वाटले कोणास ठाऊक ? त्यांनी मला त्यांचा व्याख्यानांत मला श्रोत्यांना पिळायची परवानगी दिली आणि माझा वक्त्तृवकला या प्रांतात प्रवेश झाला
         व्याख्यानमालेच्या आयोजकांशी एक दोनदा बोलणे झाल्यावर अखेर विषय ठरला . विषय माझ्या नेहमीच्या लिखानपेटीतील नव्हता असो , विषय छान होता . जुन्या हिंदी चित्रपटातील नायिकेच्या प्रेमप्रकरणावर हा विषय बेतलेला होता .
                बर पहिल्यांदाच व्याख्यान देणार होतो आणि आयोजकांनी तुम्हाला दीड  तास देणार आहोत , त्याचा पुरेपूर वापर  करा . वेळेचा आधी संपवून टाकून आम्हाला वेळ भरून काढायला सांगू नका असा सज्जड दम भरला असल्याने जरासा चिंतेनेच व्याख्यानाच्या तयारीला सुरवात केली . आयोजकांनी वेळे बाबाबत सज्जड दम भरल्याने मी मी पहिले काही दिवस विषयाची तयारी सोडून मला किती शब्दांचे भाषण करायला लागेल यावर प्रचंड विचारमंथन केले . एका मिनिटाला इतके शब्द बोलले जातात म्हणजे तासाला इतके शब्द आणि दीड  तासाला इतके शब्द अशी गणिते मी सोडवायला सुरवात केली . त्या जोडीला इतके शब्द बोलायचे म्हणजे इतके वाचायला हवे तितके वाचायला हवे हि उप गणिते होतच कि सोबत  . बर या गणितातील मुख्य गणिताची अर्थात किती शब्दाचे व्याख्यान असायला हवे याबाबाबत चे लोकनाई सांगितलेले गणित आणि माझे वास्तविक गणित काही जुळेनाच . लोक सांगायचे एक मिनिटात ३० शब्द बोलले जातात . कोणी सांगायचे ५० शब्द बोलले जातात.आणि  मी जेव्हा माझे एक मिनिटात किती शब्द बोललो हे मोजायचे ते असायचे १२५ ते १५० ( माझा बोलायचं वेग अति जास्त आहे हे मला मान्य आहे ) .
             सरते शेवटी माझे भाषण दीड तासासाठी १८६० शब्द या मर्यादेवर स्थिरावले . नंतर प्रश्न आला तो आवाजातील चढउताराचा . त्यासाठी मला नाशिकमधील दोन व्यक्तींची मदत झाली . मी कमीत कमी शब्द बोलायला मिळावे या हेतूने विषयाशी संबंधाची काही गाणी वाजवण्याचा निर्यय घेतला .ज्याने मला बरेच तारले .   व्याख्यानाची तयारी करताना मला माझ्या जुन्या लेखांची खूपच मदत झाली . माझ्या लेखनाची फ्रेमच तुकामुळे बांधली गेली असे म्हणणं हवे तर .माझ्या वाचनाच्या छंदामुळे मी जमवलेल्या पुस्तकांमुळे संदर्भ शोधण्यासाठी फारशी दगदग झाली नाही तसेच जोडीला इंटरनेट रुपी माहितीचा खजिना होताच . त्याचा वापर करत अनेक धक्के खात अखेर मी माझे पहिला जाहीर भाषण १८ एप्रिल २०१९ दिले
         

टिप्पण्या

thank you so much for comments .your comments bust my confidence

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?