ब्रेक्सिट एक अवलोकन भाग २

                                          ब्रेक्सिट विषयावरील हा दुसरा लेख . पहिल्या भागात आपण ब्रेक्सिट या विषयाची पार्श्वभुमी आणि इतिहास बघितला . आज आपण त्याची सध्याची स्थिती बघणार आहोत . ज्यांना या
विषयावरील माझा पहिला लेख वाचायचा असेल ते या दुसऱ्या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकचा वापर करून माझ्या पहिल्या लेखावर जाऊ शकतात . माझा या विषयावरील पहिला लेख १४ फेब्रुवारीला लिहला होता . त्यानंतर आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल आहे .
                                  आजमितीस युनाटेड किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी  ब्रेक्सिट विषयावर संसदेमध्ये मिळालेल्या अपयशाची जवावाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे . सध्या त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे . ब्रेक्सिट या विषयावर संसदेत अपयशी ठरलेल्या मे या दुसऱ्या पंतप्रधान .  त्यांचा आधी त्यांचाच पक्षाच्या डेव्हिड कॅमरेरून यांनी ब्रेक्सिट याच विषयावर संसदेत मतैक्य ना करता आल्याने राजीनामा दिला होता . त्या  मुळे जगाला आधुनिक प्रकारची  लोकशाही देणारा देश प्रचंड राजकीय संकटात सापडला आहे . एका राजकीय पक्षाने स्वतःची सत्ता यावी ,म्हणून खेळल्या जुगाराला आलेली एक विषवल्ली म्हणूनच याकडे बघावे लागेल
                 
       त्यामुळे युरोपीय युनियन मधून  युनाटेड किंगडम या देशाच्या बाहेर पडण्याला ज्याला ब्रिटन एक्सिट  या दोन शब्दांच्या एकत्रित शब्द म्हणून ब्रेक्सिट म्हणतात, त्याला विलंब लागत आहे . युनाटेड किंग्डम  हा देश बाहेर पडताना होणाऱ्या नुकसानी संदर्भात युरोपीय संसदेला आणि ब्रिटिश संसदेला मान्य होईल,  अश्या प्रकारच्या  सर्वसंमत  प्रस्तव तयार करण्यास अपयश आल्याने त्याची परिणीती म्हणून थेरेसा मे आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहेत . मे यांनी त्यासाठी जीवाची पराकाष्टा केली , चार चार वेळा प्रस्ताव तयार करून तो संसदेसमोर ठेवला मात्र त्यात त्यांना अपयश आले . सर्व वेळेस त्यांनी प्रस्तवात ठेवलेल्या सर्वांच्या सर्व अटी ब्रिटिश संसदेने बहुमताने नाकारल्या . या मतदानात विरोधी पक्षाच्या खासदारांबरोबर सत्तारूद्ध पक्षाचे खासदार सुद्धा होते . सत्तारूद्ध पक्षाच्या खासदारांनी सुद्धा सरकारविरोधी मतदान केले आहे , विशेष .
त्यातही गंमत म्हणजे काही दिवसांनी वेगळे होणार असून सुद्धा युरोपीय संसदेच्या या युनाटेड किंग्डम या देशात झाल्या आहेत . देश वेगळा झाल्यावर संसदेची रचना कशी होणार या बाबत साशंकता असताना या निवडणुका झाल्या आहेत . त्या निवडणुकीत युनाटेड किंग्डम या देशात ब्रेक्सिट च्या बाजून बोलणाऱ्या पक्षाला बहुमत मिळाले आहे . त्यामुळे येणाऱ्या घडामोडी बघणे फारच उच्छुकतेचे ठरेल यात शंका नाही
आधीच्या लेखाच्या लिंकसाठी पुढे क्लीक करा
  https://ajinkyatarte.blogspot.com/2019/02/blog-post_50.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?