भारतीय माध्यमे आणि शांघाय कोऑपरेशन

            सध्या किरिगिस्तान या देशात "शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या जागतिक संघटनेचे अधिवेशन चालू आहे . आपल्या देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्र  मोदी या अधिवेशनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत . या जागतिक अधिवेशनात विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये संघटनेच्या  सदस्य देशांमध्ये आर्थिक , व्यापारी सामाजिक, सांस्कृतिक , प्रादेशिक शांतता , शास्त्र विषयक  घडामोडी ,बदलते पर्यावरण  राजकीय घडामोडी  आदी घडामोंडीचा समावेश असणार आहे . त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहे . ज्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा असणार आहेत . कोणत्याही जागतिक अधिवेशनात काही द्विस्तरीय पातळीवर चर्चा होतच असतात . त्याच न्यायला अनुसरून भारताचे पंतप्रधान  नरेंद मोदी यांचा  काही राष्टांच्या प्रमुखांशी  चर्चा होणार आहेत . ज्यामध्ये प्रामुख्याने चीन या राष्टाशी आपले नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत .
         
    मात्र भारतातील प्रादेशिक भाषेतील  माध्यमांकडून या अधिवेशनाचे वार्तांकन करताना या अधिवेशनात चर्चिला जाणाऱ्या बाबींवर फारशा प्रकाश टाकला जात नाहीये . माध्यमामांचा सर्व जोर हा चीन आणि  पाकिस्तान या दोन देशांवरच फिरताना दिसत आहे . जणूकाही हि त्रिस्तरीय चर्चा असून किरगिस्तान या चर्चेसाठी मध्यस्थी करत आहे  जे फारसे योग्य नाही .
मी आतापर्यंत ज्या ज्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे,  , परिषदेचे भारतीय माध्यमात वार्तांकन बघितले आहे , त्यामध्ये मला हा मुद्दा पकर्षाने जाणवला आहे . आपले सर्व वार्तांकन भारतीय नेत्याने काय काय केले , त्याला अन्य प्रतिनिधींनी कोणत्या प्रकारे प्रतिसाद दिला . . यावरच काट्याकुट केलेला आढळला आहे . नाही म्हणायला त्याला जोड असते पाकिस्तानच्या बाबींचीआणि अत्यंत थोड्या प्रमाणात चीनची
मात्र परिषदेत कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे?  . ती का होणार आहे ?  या अधिवेशनात कोण कोणते निर्यय घेण्यात आले . त्याचा काय परिणाम होणार आहे . यावर फारसी माहिती देण्यात येत नाहीए हे  माझे निरीक्षण आहे . काही तुरळक मराठी माध्यमांचा अपवाद वगळता सर्वत्र हीच परिस्थिती आहे .(माझे हे निरीक्षण परिपूर्ण आहे असा माझा दावा नाहीये )
              आपल्या मराठीत एक म्हण  आहे . " पळसाला पाने तीनच " या म्हणीला  जागून अन्य प्रादेशिक भाषेत सुद्धा फारशी वेगळी परिस्थीती  असेल  असे वाटत नाही .  नाही म्हणायला इंग्रजी भाषेत अश्यांसारख्या अधिवेशनाचे सविस्तर वृत्तांत येत असतात . मात्र आपल्या  भारतात इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा प्रादेशिक भाषेला अधिक मागणी असते , हे सर्वश्रुत आहेच . संत ज्ञानेश्वरांनी देखील हाच धागा पकडून त्यावेळच्या लोकभाषेत ज्ञान आणले होते . जी भूमिका आजच्या माध्यमांनी निभावणे ही काळाची गरज आहे .
                                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?