खेळांचा राजा बुद्धिबळ

                                  आपल्याकडे आंब्याला फळांचा राजा , गुलाबाला फुलांचा राजा  म्हणून संबोधले जाते . त्याचा धर्तीवर खेळांचा राजा म्हणून कोणास संबोधायचे झाल्यास ती जागा घेण्यासाठी बुद्धिबळापेक्षा दुसरा
दावेदार असूच शकत नाही , यात शंका नसावी . शारीरिक तंदरुस्तीबरोबर बुद्धीचे सामर्थ्य जोखणारा दुसरा खेळ असूच शकत नाही . काही जणांना आश्चर्याचे वाटेल, मात्र बुद्धिबळात शारीरिक क्षमता काशीकाय  जोखली जाते ? त्यांना मी सांगू  इच्छितो की  निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे तुम्हाला ज्ञात असेलच . जर तुमचा एखादा पाय अथवा एखादा हात जर जायबंदी असेल तर तुम्ही योग्य पध्द्तीने एखाद्या गोष्टीवर लक्ष देऊ शकणार नाही . आता शाररिक तंदुरुस्ती शिवाय आपण हातपाय जायबंदी होण्यापासून कसे काय रोखू शकू ? म्हणजेच एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा जोखणारा हा खेळ आहे .
           
     काही जण असे हि म्हणू शकतील की बाकीच्या सर्वच खेळात कमी अधिक प्रमाणात हे जोखले जाते . महा बुद्धिबळालाच खेळांचा राजा म्हणून का संबोधायचे   ? त्यांना मी सांगू इच्छितो की , जर अन्य खेळात या क्षमता तपासल्या जात असल्या तरी त्या खेळांसाठी लागणारे साहित्य आणि क्रीडांगण यांचा विचार करता बुद्धिबळ हा अत्यंत आटोपशीर खेळ आहे . सध्या किक्रेटचा विश्वचषक सुरु असलयाने क्रिकेटचा विचार करू . क्रिकेट खेळण्यासाठी किमान २२ जण लागतात . त्याचा प्रमाणे १ चेंडू आणि दोन क्रिकेटच्या बॅट ग्लोज , हेल्मेट इत्यादी साहित्यांबरोबर मोठे क्रीडांगण लागते . याउलट गोष्ट बुध्दिबळाची आहे. एखाद्या मोठया वट वृक्षाच्या विसाव्यात देखील हा खेळ सहज खेळात येऊ शकतो , याला खेळाडू देखील जास्त लागत नाही.  फक्त दोन खेळाडू असले तरी हा खेळ खेळात येतो . किंवा आपण स्वतः एकटा असलो तरी संगणकाबरोबर हा खेळ खेळात येतो . अन्य बैठ्या खेळात आपणास किमान एक जण तरी लागतो इथे  त्याची पण गरज नाही (अपवाद ludo king ) शिवाय या खेळाच्या स्पर्धेत वेळेचे बंधन असल्याने जलद निर्णय घेण्याची क्षमतेनिर्माण होते ज्याचा सध्याचा स्पर्धापरीक्षेचा जगात  खूपच फायदा होऊ शकतो .  किंबहुना केंद्रीय नागरी परीक्षेच्या विद्यार्थ्याने त्यांचा CSAT या पेपरच्या  तयारीसाठी का होईना बुद्धिबळ खेळायलाच हवे . 
बुद्धिबळ हा खेळ पूर्णतः भारतीय आहे . बँडमिंटन, हॉकी य यासारखे खेळांचा उगम जरी भारतात असला तरी ते खेळ भारतीयांनी शोधलेले नाहीत . त्याचा शोध ब्रिटिशांनी लावलेला आहे . याचा शोध भारतीयांनीच लावलेला आहे . हे विशेष . त्यामुळे खऱ्या अथाने खेळांचा राजा म्हणून बुद्धिबळ या कडेच बघता येते हे नक्की . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?