हवामान बदलावर नको चर्चा , कृती हवी

                  अखेर महाराष्ट्रात मान्सून आला . मात्र यंदा मान्सून कमी बसणार आहे , अशी  शक्यता    हवामान खात्यामार्फत वर्तवली जात असल्याने , समस्त बळीराजा  चिंतेत आहे . मात्र ही चिंता फक्त फक्त भारतातील शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये .युरोप खंडातील जनतादेखील प्रचंड उष्माने त्रस्त आहे .गेल्या कित्येक  वर्षातील   तापमानाची उच्चांकी  नोंद आज युरोपात  होत आहे . त्यामुळे तिथे अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीय . तेथील सरकारने तेथील लोकांना जरासे हायसे वाटावे या उद्देश्याने तिथे कारंजे सुरु केले आहेत . तेथील ही परिस्थिती अजून काही दिवस सुरूच राहणार असल्याचे तेथील हवामान खात्याने जाहीर केली आहे . जेट स्ट्रीममुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे . भारतीय मान्सूनवर  प्रभाव टाकणाऱ्या १७ घटकांपैकी जेट स्ट्रीम हा महत्वाचा घटक आहे . हे आपणास माहिती असेलच .
म्हणजेच मान्सून हा जागतिक हवामान संस्थेचा भाग आहे . त्यामुळे सध्या भारतात कमी पडणारा मान्सून हा सध्याचा हवामान बदलाचा भाग आहे .
                        आतापर्यंत प्रत्येक वर्षी डिसेम्बर महिन्यात COP या परिषदेच्या अनेक फेऱ्या झाल्या . आता प्रत्यक्ष कार्यवाही  करण्याची गरज निर्माण झाली आहे . आणि आपल्या सुखवस्त जीवनातून बाहेर पडून थोडे देखील कष्ट घेण्याची तयारी अमेरिका घेत नाहीये . आतापर्यंत झालेल्या हवामान बदलांविषयी झालेल्या विविध परिषदांमध्ये घेण्यात आलेल्या निर्यांयापैकी एकही निर्णय अमेरिकेने  पाळाला नाहीये .दरवेळी भारत आणि चीन च्या संदर्भ देऊन ते पाळणार असतील तर आम्ही तो पळू अशी भूमिका घेतली आहे . मात्र दरवेळी अमेरिका एका गोष्टीकडे कानाडोळा करतेय ती म्हणजे त्यांनी पृथ्वीवरील साधन संपत्तीचा बेसुमार वापर करत स्वतःचा विकास केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली  आहे . भारत आणि चीन हे विकसनशील देश आहे . त्यांना पण प्रगती करणायचा अधिकर आहे . त्यासाठी त्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीची ही लागणारच आहे .
               आतापर्यंत क्योट्यो प्रोटोकॉल , कोपनहेगन ची परिषद , पॅरिस ऍग्रिमेंट , आदी अनेक परिषदांमधून हवामान बदलाविषयी प्रचंड चर्चा झाली . मात्र आवश्यक ती कार्यवाही करण्याची वेळा येऊन ठेपली आहे . थोर भौतिकशास्त्राचे  शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी मानवी जीवन या पृथवीतलावर अजून फार काळ राहू शकणार नसल्याचे भाकीत केलेच होतेच , तो काळ जास्तीत जास्त लांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्येक आहे . आजमितीसतीस तरी पृथवी हा एकाच ग्रह मानवास वस्ती योग्य असल्याचा सध्याचा विज्ञानास  माहिती आहे . त्यामुळे ती वाचवणे आवश्यक आहे . यात शंका नाही .
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?