याने होवू शकतो का सकारात्मक बदल ?

                                 माझे रविवारी सायंकाळी जूह मुंबई येथे राहणाऱ्या  आणि  मराठीसाठी
कार्यरत असणाऱ्या  एका तज्ञ व्यक्तीशी बोलणे झाले . त्यांनी मराठीसाठी काय करावे ? असे तुम्हाला वाटते असे विचारले असता,  मी म्हणालो मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी काहीतरी करायला पाहीजे.  असे मी त्यांना सांगीतल्यावर त्यांनी मला पूर्वी असा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगीतले माञ तज्ञांच्या विदवत्तेकडे न बघता त्यांचा शुध्दलेखनाकडे अतिरीक्त प्रमाणात लक्ष दिल्याने तज्ञ मराठीत लिहण्यास तयार होत नाहित ते मला असेही म्हणाले की संस्कुतप्रचूर मराठी व्याकरण बदलून मराठीचे अस्सल व्याकरण वापरावे जे आपणास 18व्या शतकाच्या पुर्वीचा लेखनात दिसते ज्यात एकच उकार आणी एकच वेलांटी असे 
                                          माञ ब्रिटीश काळात जेव्हा मराठीचे व्याकरण सुञबध्द करण्यात आले त्यावेळी पुण्यातील त्या वेळच्या साक्षर लोकांकडून जाणूनबुजुन दोन वेलांट्या आणि  दोन उकार मराठीत घूसडण्यात आले आणी सहजसोपी मराठी अवघड करण्यात आली तिला गतस्वरुप परत देण्यात आले तर शास्ञज्ञापासून सर्वसामन्य कामगार ही सहजतेने व्यक्त होवू शकतो मला मराठी भाषेच्या ईतीहासाबाबत फारशी माहीती नाही. 
   
                         माञ माझा मते त्यांचा रह्रस्व दार्घ या प्रकारामुळे आलेले मराठीचे बोजडत्व कमी करण्साचा प्रयत्न खरोखरीच स्त्यूत आहे तुम्हाला काय वाटते ? मराठीला इंग्रजी सारखी ज्ञानभाषा बनवण्यासाठी एकच ऊकार एकच माञा वापरणारी मराठी साह्यभुत ठरू शकेल का ? की तो केवळ देखावा होइल चला मराठीसाठी काहीतरी केले याचा ? मराठी चे स्वतंञ्य व्याकरण होते माञ ते पध्दतशीर संपवण्यात आले किंबहूना याची प्रत्यक्ष लेखी कबुली खुद्द इंग्रजांच्या काळात ज्याने मराठीचे व्याकरण ज्यांनी लिहले त्यांनी सांगीतले याबाबत तज्ञांनी क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती .
                              मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी या गोष्टीची खरीच गरज आहे का ? की ही गोष्ट न करताच मराठी ज्ञानभाषा बनू शकते ? आपणास काय वाटते ? शुध्दलेखनाचा बागलबुवा उभा केल्याने खरोखर मराठीचे नुकसान होते का ? असे अनेक प्रश्न त्यांचा स्वता: हून मला फोन केल्याने निर्माण झाले आहेत .असो या विषयी खुप काही बोलता येइल ते माझ्याशी जवळ अर्धा तास बोलत होते त्यानी अनेक विषयावर स्पर्श केला .त्या विषयी नंतर कधी बोलेल तुर्तास येथेच थांबतो 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?