टुर द फ्रान्स , सायकलस्वारांची मांदियाळी

सध्या समस्त भारतात क्रिकेट विश्वचषकाची चर्चा सुरु असताना तिकडे युरोपात सायकस्वारांची जत्रा अर्थात टुर द फ्रान्स ही स्पर्धा सुरु झालीये . पुढील तीन आठवडे ही स्पर्धा सुरु असणार आहे . या कालावधीत स्पर्धक विविध अडथळ्यांना पार करत ही स्पर्धा जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. दर ठराविक अंतरावर उभे राहुन प्रेक्षक स्पर्धकांना प्रोत्साहित करतील .स्पर्धक 3460 किलोमीटर सायकल चालवतील .(भारताची उत्तर दक्षीण लांबी 3214 किलोमीटर आहे) या स्पर्धेचे हे 106वे वर्ष आहे .
                स्पर्धकाच्या शाररीक क्षमतेची ही स्पर्धा जगभरात लोकप्रिय आहे .  जगभरातील 200 देशात हा खेळ खेळला जातोय .आपल्या भारतात आता कुठे  एक साहसी खेळ म्हणून सायकलींगची सुरवात होतीये . यावेळी ही स्पर्धा बेल्जीयम या देशाच्या राजधानीपासून अर्थात बेल्गेर्ड या शहरापासून सुरु होत आहे . स्पर्धेला सुरवात झाल्यापासून तिसऱ्यांदा स्पर्धा  बेल्जीयम देशातून  सुरू होतेय . या तीन पैकी 2 वेळेस स्पर्धा बेल्गेड शहरापासून सुरू होत आहे. 28 जुलैपर्यत ही स्पर्धा चालेल. 
          आपण पुढील चित्रात तिचा मार्ग बघू शकता .
या स्पर्धेच्या मार्गात पर्वतीय प्रदेश , पठारी प्रदेश आणि मैदानी प्रदेश या तिन्ही प्रकारचा भूरूपातून जातो . सायकलच्या जगातील प्रमुख 3 स्पर्धांपैकी ही  एक आहे . या स्पर्धेचे 21  टप्पे असून त्यातील 7 टप्पे हे मैदानी आणि पर्वतीय  प्रदेशातून आहे तर 5 टप्पे  पठारी प्रदेशातून आहेत  संघ आणि वैयक्तिक स्पर्धकांसाठी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी एक टप्पा असेल .  या काळात 10 व्या  आणि 15 व्या टप्यानंतर या स्पर्धेत एका दिवसाची विश्रांती असेल . सध्या जगभरात  या स्पर्धेबरोबरच  विब्लडन  आणि महिलांच्या फुटबॉलचा विश्वचषकाची आणि क्रिकेटच्या विश्वचषकाची स्पर्धा सध्या सुरु आहे . त्यातील विबल्डन विषयी मी  आधीच लिहले आहे . महिलांच्या  फ़ुटबाँलच्या विश्वचषकाविषयी लवकरच  लिहिलं तो पर्यंत  राम राम .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?