मनोहारी चमत्कार सृष्टीचा चंद्रग्रहण

 येत्या मंगळवारी अर्थात 16 जुलैला आकाशात एक अत्यंत मनोहारी दृश्य दिसणार आहे . यावेळी रात्री एक वाजून बत्तीस मिनिटांपासून पहाटे चार वाजेपर्यंत  आपल्याला आपला लाडका चंद्र काहीसा लाल झालेला दिसेल . मात्र घाबरू नका , तो कोणावर चिडल्याने लाल होणार नसून त्याला ग्रहण  लागल्याने तो लालसर होणार आहे . मित्रानो ग्रहण हा एक  सृष्टीचा एक मनोहारी चमत्कार आहे . तो तुम्ही अवश्य बघावा . येत्या मंगळवारी दिसणारे हे वर्षातील दुसरे मात्र भारतातून दिसणारे पहिले चंद्रग्रहण असणार आहे . तुम्ही खालच्या नकाश्यात हे ग्रहण कोणकोणत्या भागात दिसत आहे , हे बघू शकतात .
तुम्ही  बघू शकतात . संपूर्ण आशिया खंड , युरोप खंड अंटार्टिका , दक्षिण अमेरिकका खंड आफ्रिका खंड या भागात हे दिसणार आहे . आणि चंद्रग्रहण आपण साध्या डोळ्याने बघू शकतो , त्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नसते . मात्र सध्याच्या पावसाळी हवेत हे ग्रहण दिसू शकेल का हा प्रश्नच आहे . आपण देवाकडे प्रार्थना करू की , मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस हवामान पूर्णतः कोरडे ठेव त्या दोन दिवसात पाऊस पडू नको रे बाबा .
17 जुलैला रात्री एक वाजून बत्तीस मिनिटांनी चंद्र सावलीत प्रवेश  करेल . ग्रहणाच्या सर्वोच्च बिंदू रात्री रात्री तीन वाजून एक मिनिटांनी असेल तर पहाटे   साडेचारला चंद्र सावलीतून पूर्ण बाहेर पडला असेल भारतातून दिसणारे या वर्षातील हे एकमेव चंद्रग्रहण असल्याने जास्तीत जास्त लोकांनी हे ग्रहण अनुभवायचा प्रयत्न करावा .  यानंतर भारतातून दिसणारे ग्रहण सूर्यग्रहण आहे आणि 26 डिसॅबरला दिसेल . मंगळवारी दिसणारे ग्रहण खंडग्रास असल्याने फारसे आकर्षक नसले तरी ते चुकवू नये ग्रहण बघण्यात काहीही वाईट नाही . तर मग करू एन्जॉय हा मनोहारी चमत्कार सृष्टीचा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?